ETV Bharat / city

LIVE Updates : मुंबई सिटी मॉलची आग पुन्हा धुमसली; नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरुच

author img

By

Published : Oct 23, 2020, 6:28 AM IST

Updated : Oct 24, 2020, 12:23 PM IST

मुंबई
मुंबई

12:06 October 24

मुंबईच्या सिटी सेंटर मॉल येथे लागलेली आग पुन्हा धुमसली

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री ८.५३ वाजता आग लागली होती

12:05 October 24

 दुपारी ३.३७ वाजता या आगीवर सर्व बाजूने नियंत्रण मिळवण्यात आल्याचे सांगण्यात आले

12:04 October 24

37 तास उलटले,  अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती  

12:04 October 24

आग विझवण्यासाठी २५० अधिकारी, कर्मचारी -

12:04 October 24

सिटी सेंटर मॉल तळमजला अधिक तीन मजले स्वरूपाची इमारत आहे

12:04 October 24

आग विझवण्यासाठी २४ फायर इंजिन, १६ जंबो टँक यांच्यासह एकूण ५० अग्नि विमोचक वाहने तैनात करण्यात आली

12:03 October 24

या दरम्यान ५ जवान जखमी झाले आहेत.

11:53 October 24

सिटी सेंटर मॉलची आग पुन्हा भडकली, 37 तासांपासून नियंत्रणाचे प्रयत्न

अग्निशामक दलाच्या जवानांनी ब्रिगेड कॉलच्या या आगीवर शुक्रवारी दुपारी नियंत्रण मिळवले होते. मात्र, कुलींग ऑपरेशन दरम्यान पुन्हा भडका उडाला आहे.

11:52 October 24

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली आग पुन्हा धुमसली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली होती

14:43 October 23

मुंबई - मध्यवर्ती बेस्ट बस डेपोजवळ असलेल्या 'सिटी सेंटर मॉल'मध्ये गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन दलाने सातत्याने प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली आहे.

08:25 October 23

घटनास्थळी २४ फायर इंजिन दाखल

घटनास्थळी २४ फायर इंजिन दाखल

लेव्हल-५ला पोहोचलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी २४ फायर इंजिन आणि १७ जम्बो टँकर दाखल झाले आहेत.

08:24 October 23

दोन्ही फायरमन्सना रुग्णालयातून डिस्चार्ज

ही आग विझवण्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या अग्नीशामक दलाच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रवींद्र प्रभाकर चौगुले (53) आणि शामराव बंजारा (33) अशी दोघांची नावे आहेत.

07:17 October 23

दहा तासांनंतरही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू..

मुंबई सिटी सेंट्रल मॉलची आग 'लेव्हल-५' म्हणून घोषित

07:04 October 23

आणखी एक अग्निशामक कर्मचारी जखमी

आग विझवण्याच्या प्रयत्नात आणखी एक अग्निशामक कर्मचारी जखमी झाला आहे. त्याला जेजे रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.

07:03 October 23

३५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

सिटी सेंटर मॉल शेजारील इमारतीत राहणाऱ्या सुमारे ३५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

06:53 October 23

लेव्हल पाचची आग घोषित

सिटी सेंटर मॉलला लागलेली आग ही 'लेव्हल-५'ची आग घोषित करण्यात आली आहे. 

06:22 October 23

५५ मजली इमारत केली रिकामी..

मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले आहे. सिटी सेंटर मॉल आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्याच वेळी या मॉलच्या बाजूला असलेली 55 मजली ऑर्किड एन्क्लेव ही इमारत रिकामी करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे.

06:22 October 23

आग विझवण्यासाठी २५० अधिकारी, कर्मचारी..

मुंबईतील सिटी सेंटर मॉलला आग

आग विझवण्यासाठी 24 फायर इंजिन, 16 जंबो टँक यांच्यासह एकूण 50 अग्निविमोचक वाहने तैनात आणि कार्यरत आहेत. मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यासह एकूण सुमारे 250 अधिकारी व कर्मचारी आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

06:22 October 23

जवान जखमी, प्रकृती स्थिर..

आगीच्या धुरामुळे शामराव बंजारा या 33 वर्षीय जवानाला श्वास घेण्याचा त्रास झाल्याने 108 च्या अम्ब्युलन्सने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या जवानाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जेजे रुग्णालयाकडून देण्यात आली.

06:20 October 23

पहाटे तीनच्या सुमारास ब्रिगेड कॉलची घोषणा..

सुरुवातीला ही आग लेव्हल-1 ची होती. मात्र, रात्रीच्या 10.44 वाजताच्या सुमारास आगीने लेव्हल-3 तर 11.45 वाजताच्या सुमारास आगीने भीषण रूप धारण केल्याने ही आग लेव्हल-4 म्हणून घोषित करण्यात आली. मात्र, मध्यरात्री 2.45 च्या सुमारास ब्रिगेड कॉलची घोषणा करण्यात आली.

06:10 October 23

मुंबई सिटी सेंटर मॉल आग..

गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी किशोरी पेडणेकर, आमदार अमीन पटेल, महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकानी यांनी रात्री उशिरा भेट देवून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती जाणून घेतली.

Last Updated : Oct 24, 2020, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.