मुंबई - मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. तुलनेत सध्या मुंबईतील हवा अत्यंत खराब असल्याची नोंद झाली आहे. एअर क्वालिटी इंडेक्सनुसार आज प्रदुषणाचा निर्देशांक 221 मोजला गेली. रात्री ही पातळी अजून वाढेल असा अंदाज आहे.
देशाची राजधानी दिल्ली पाठोपाठ मुंबईतील हवेची गुणवत्ता देखील मोठ्या प्रमाणात घसरली आहे. दर दिवाळीमध्ये मुंबईतील हवा प्रदूषणाचा निर्देशांक वाढतो. लक्ष्मीपूजनानंतर वाजवण्यात आलेल्या फटाक्यांनंतर हवेची गुणवत्ता आणखी घसरली आहे.
हेही वाचा - बलिप्रतिपदा : गवळी समाजातर्फे शेकडो वर्षापासून 'सगर' उत्सवाची परंपरा कायम
- फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता घसरली -
आज देखील कुलाबा, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल येथे हवेची गुणवत्ता खालावली होती. या तीनही ठिकाणी हवा अतिवाईट स्वरूपाची असल्याची नोंद झाली. कुलाबा येथे पीएम २.५ चा निर्देशांक 328 होता. माझगाव येथेही पीएम 2. 5 निर्देशांक अतिवाईट अर्थात 309 नोंदला गेला आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथे पीएम 2.5 चा निर्देशांक 305 होता, चेंबूर, मालाड येथे हवेचा निर्देशांक पीएम 2.5 इतका आहे. दोन्ही ठिकाणी गुणवत्ता निर्देशांक 200 च्या पुढे आहे. यासोबतच बोरिवली, भांडुप, अंधेरी आणि वरळी येथे हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची आहे.
भाऊबीज निमित्त फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जातात. यामुळे हवेची गुणवत्ता आणखी घसरेल असा अंदाज वर्तवला जात आहे. हवेमध्ये आणखी दीर्घकाळ प्रदूषके साचून हवेची गुणवत्ता अधिक बाधित होणार असल्याचे सांगितले जात आहे.
- मागील वर्षीच्या दिवाळीत हवेची गुणवत्ता चांगली -
मागील वर्षी असलेली फटाक्याची बंदी यामुळे मागील वर्षी हवेची गुणवत्ता दिवाळीमध्ये चांगली नोंदवण्यात आली होती. मात्र, यावर्षी बंदी नसल्यामुळे हवेची गुणवत्ता काही प्रमाणात घसरली आहे. मागील काही वर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाके कमी प्रमाणात फोडले गेल्याचे चित्र आहे. रविवारनंतर योग्य तो अंदाज काढता येणार आहे.
हेही वाचा - वुहानमधील संसर्गाचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला तुरुंगवास; चीन सरकारची केली होती 'पोलखोल'