ETV Bharat / city

Gudipadwa 2022 : शोभायात्रेत गिरगावात २० फुटाची मुंबादेवी मातेची मूर्ती - श्री मुंबादेवी मातेची २० फूटी मूर्ती

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ च्या वतीने दोन वर्षाच्या मध्यांतरानंतर यावर्षी शनिवारी २ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या नववर्ष दिनी भव्य 'हिंदू नववर्ष स्वागत सोहळा' अर्थात मराठी संस्कृतीचा ठेवा, गुढीपाडवा भव्य मिरवणुक व आकर्षक स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळयाची सुरुवात सकाळी ८.०० वाजता गिरगाव नाक्यावर उभी असलेल्या 'आरोग्य गुढीचे पूजन करुन होईल.

Gudipadwa 2022
Gudipadwa 2022
author img

By

Published : Apr 1, 2022, 3:25 PM IST

मुंबई - राज्य सरकारने कोरोना संदर्भात सर्वच निर्बंध हटवल्याने आता गुढीपाडवा निमित्त मुंबईत निघणाऱ्या शोभायात्रा अतिशय उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात साजरा होणार आहेत. विशेष करून मुंबईमधील गिरगाव येथील गुढीपाडव्याची शोभायात्रा ही नेहमीच त्यांच्या नावीन्यपूर्ण सजावटीसाठी चर्चेचा विषय झालेली आहे. यंदा या शोभायात्रेत साकारली गेलेली २० फुटाची मुंबादेवीची भव्य प्रतीकृती आकर्षणाचं केंद्रबिंदू असणार आहे.

मातेची प्रतीकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू
१५ आकर्षक चित्ररथांचा सहभाग
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ च्या वतीने दोन वर्षाच्या मध्यांतरानंतर यावर्षी शनिवारी २ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या नववर्ष दिनी भव्य 'हिंदू नववर्ष स्वागत सोहळा' अर्थात मराठी संस्कृतीचा ठेवा, गुढीपाडवा भव्य मिरवणुक व आकर्षक स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळयाची सुरुवात सकाळी ८.०० वाजता गिरगाव नाक्यावर उभी असलेल्या 'आरोग्य गुढीचे पूजन करुन होईल. नंतर मिरवणूक गिरगाव-ठाकुरद्वार- चिराबाजार मार्गे प्रिंसेस स्ट्रीट पर्यंत जाणार आहे. या स्वागत सोहळयामध्ये दक्षिण मुंबईतील शाखाप्रुखांच्या माध्यमातून एकूण १५ आकर्षक चित्ररथ सहभागी होणार आहे.
15 चित्ररथ होणार सहभागी
चित्ररथांमध्ये मुंबई महानगरपालिका देशातील आदर्श महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार देशात अव्वल क्रमांकाचे सरकार, तसेच पर्यावरण, पौराणिक, एैतिहासिक, सांस्कृतिक विषयावर आधारित विविध चित्ररथ सहभागी होणार आहे. तसेच तमाम मुंबईकरांना वेध लागलेल्या व गिरगावकरांची अस्मिता असलेल्या या उत्सवामध्ये गिरगावातील सुप्रसिध्द जगदंबा ढोलपथक, मुंबईतील डबेवाल्यांचा डबेवाला भवन व त्यांची पारंपारिक दिंडी, १५१ महिला बाईकस्वार पारंपारिक वेशभूषेत सहभागी होणार असून मल्लखांब खेळाचे प्रात्यक्षिक, भारतातील संगीतातील अनमोल रत्न, 'भारतरत्न लता मंगेशकर' यांच्यावर आधारित चित्ररथ संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गिरगाव त्याच बरोबर सोहळयाचे मुख्य आकर्षण म्हणजेच चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बनविलेली श्री मुंबादेवी मातेची २० फूटी भव्य प्रतिकृती ही आकर्षणाचं केंद्रबिंदू असणार आहे.
शोभायात्रेत बक्षिसांची लयलूट
या सोहळयात मराठी चित्रपट ‘चंद्रमुखी' मधील सुप्रसिध्द कलाकार प्रसाद ओक, अमृता खानविलकर, प्राजक्ता माळी, मृणाल कुलकर्णी, आदिनाथ कोठारे निर्माते अक्षय बद्रापुरकर सहभागी होणार असून महाराष्ट्र व्यापारी पेठ, दादरचे संचालक कौतिक दांडगेंच्या वतीने सहभागी महिलांसाठी दोन सोन्याच्या नथी तसेच ९ पैठणी साडया बक्षिसे देण्यात येणार आहे. तरुण-तरुणींसाठी आकर्षक सुटपीस, ज्वेलरी बॉक्स, लहान मुलांसाठी आकर्षक बक्षिसे, जेष्ठ नागरिक ५ विजेत्या जोडप्यांना १ दिवसीय सहलीमध्ये सहभागी होता येणार आहे. हिंदू नववर्ष स्वागत सोहळयामध्ये नागरिकांनी अवश्य पारंपारिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक पांडुरंग सकपाळ यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.