ETV Bharat / city

ST Workers Strike : संपकरी एसटी कामगारांना मोठा झटका, आता 'या' कर्मचाऱ्यांच्या हाती लालपरीची धुरा! - PSV Passanger Safety Vehicle Badge

गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या एस टी कामगारांच्या संपावर तोडगा निघालेला ( ST Workers Strike ) नाही. या संपकरी कर्मचाऱ्यांना मोठा झटका देत महामंडळाने आता यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या हाती लालपरीचे स्टिअरिंग ( Mechanical Staff Used As Driver In MSRTC Bus ) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी कर्मचारी संप
एसटी कर्मचारी संप
author img

By

Published : Jan 20, 2022, 8:44 PM IST

मुंबई - गेल्या ८५ दिवसांपासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना ( ST Workers Strike ) वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे एसटीची वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता यांत्रिक कर्मचारी व सहायक वाहतूक निरीक्षक यांचा वापर संपकाळात चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रक यांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला ( Mechanical Staff Used As Driver In MSRTC Bus ) आहे. विशेष म्हणजे संप काळात सेवा देणाऱ्या कामगारांना प्रती दिन ३०० रुपये इतका प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व विभागीय कार्यालयाला पाठवले पत्र

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करू सुद्धा कर्मचारी आंदोलन मागे घेत नाही. यामुळे हा संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने आणखी एक शक्कल लढवली आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी बेकायदा संप पुकारला आहे. त्यामध्ये मुख्यत्वे चालक व वाहक यांचा समावेश असल्याने अत्यल्प प्रमाणात वाहने चालू आहेत. जास्तीत जास्त वाहने चालनात आणण्याकरीता विविध उपाययोजना अमलांत आणण्यासाठी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत सर्व अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेअंती यांत्रिक कर्मचारी व सहायक वाहतूक निरिक्षक यांना उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर संपकाळात चालक तसेच वाहतूक नियंत्रकांचा वाहक म्हणून वापर करण्याबाबत निर्णय झाला आहे. याबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय कार्यालयाला पाठविण्यात आले आहे.

दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण

संप कालावधीमध्ये प्रथम टप्यात चालक पदातून ज्यांना वाहन परीक्षक व सहायक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. अशा कर्मचाऱ्यांना २ दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन, त्यांचा वापर प्रवासी वाहनांवर चालक म्हणून करण्यात येणार आहे. संपकालावधीमध्ये दुसऱ्या टप्प्यात ज्या यांत्रिक कर्मचाऱ्यांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना आहे. अशा यांत्रिकी कर्मचाऱ्यांची माहिती विभागीय पातळीवर संकलीत करून, त्यांचेकडून विभागीय पातळीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये तात्काळ ऑनलाईन अर्ज करून प्रवासी वाहन चालक अनुज्ञप्ती ( PSV Passanger Safety Vehicle Badge ) बिल्ला काढण्याचा सूचना महामंडळाने सर्व विभागीय कार्यालयांना पाठवलेल्या पत्रात दिल्या आहे.

३०० रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार

यांत्रिक अथवा वाहतूक कर्मचारी यांचा वापर संप काळात चालक म्हणून आणि वाहतूक नियंत्रक यांचा वापर संपकाळात वाहक म्हणून केल्यानंतर अशा सर्वच कर्मचाऱ्याना प्रती दिन ३०० रुपये इतका प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.