ETV Bharat / city

MPSC Result: दोन वर्षानंतर MPSCचा सुधारित निकाल जाहीर; प्रसाद चौगुले राज्यात प्रथम - मुलीमध्ये मानसी पाटील राज्यात पहिली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल जाहीर केला आहे. एमपीएससीने या सदंर्भात परिपत्रक जारी केले आहे. एमपीएससी 413 पदांचा निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. या परीक्षेत साताऱ्या जिल्हाचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आलेला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रवींद्र शेळके आला आहे. तर मुलीमध्ये मानसी पाटील हे राज्यात पहिली आलेली आहे.

MPSC Result: Revised results of MPSC announced; Prasad Chowgule first in state
दोन वर्षानंतर MPSCचा सुधारित निकाल जाहीर; प्रसाद चौगुले राज्यात प्रथम
author img

By

Published : Sep 28, 2021, 8:23 PM IST

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल जाहीर आज (मंगळवार) करण्यात आलेला आहे. या परीक्षेत साताऱ्या जिल्हाचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आलेला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रवींद्र शेळके आणि तिसऱ्या क्रमांकावर रोहन कुवर आले आहेत.

अखेर निकाल जाहीर -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल जाहीर केला आहे. एमपीएससीने या सदंर्भात परिपत्रक जारी केले आहे. एमपीएससी 413 पदांचा निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. मराठा समाजाला देण्यात आलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) आरक्षणाला 9 सप्टेंबर 2020 रोजी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आणि 5 मे 2021 रोजी अंतिम निकालात SEBCचे आरक्षणच रद्द केल्यामुळे हा निकाल रखडलेला होता. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. याची दखल एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आभार मानलेले आहे.

प्रसाद चौगुले राज्यात पहिला -

मराठा समाजाला देण्यात आलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) आरक्षण कोर्टाने रद्द केल्यानंतर उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी या 413 पदांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. आता निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या परिक्षेत सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौगुले राज्यात पहिला आला आहे तर दुसरा रवींद्र शेळके आणि तिसऱ्या क्रमांकावर रोहन कुवर आले आहे. मुलीमध्ये मानसी पाटील हे राज्यात पहिली आलेली आहे.

हेही वाचा - 'उपर वाला देता है तो छप्पर फाड कर देता है'; सलून चालक झाला रातोरात करोडपती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.