ETV Bharat / city

MPSC On Paper Leak : एमपीएससीचा पेपर फुटलाच नाही - आयोगाचे स्पष्टीकरण - एमपीएससी पेपर फुटी

महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परिक्षेचे आयोजन करण्यात आले. नागपुरात एका परिक्षा केंद्रावर पेपर फोडल्याचा ( MPSC Paper Leak in Nagpur ) आरोप करत अखिल भारतीय परिषदेने ( ABVP Agitation ) आंदोलन केले. मात्र, अशी कोणतीही घटना झाली नसून पेपर फुटल्याबाबतची माहिती चुकीची आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 23, 2022, 4:39 PM IST

मुंबई- महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021चे ( MPSC Pre Exam ) आयोजन आज (दि. 23 जानेवारी) राज्यभरात करण्यात आले आहे. मात्र, नागपुरात एका परीक्षा केंद्रावर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर फुटीचा आरोप करत विद्यार्थी संघटनेने आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर काही वेळातच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असे स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आले ( MPSC on Paper Leak ) आहे.

विद्यार्थी संघटनेचे आंदोलन - मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा ( MPSC Pre Exam ) 2021 च्या प्रश्नसंचाचा एक सील नियमबाह्य पद्धतीने नागपुरातील एका परीक्षा केंद्रावर फोडण्यात आल्याचा ( MPSC Paper Leak in Nagpur ) आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन ( ABVP Agitation ) केले होते. आज सकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्त्यांना परीक्षा केंद्रामधून एका विद्यार्थ्याने या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच प्रश्नसंचचा सील फोडण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले. याबाबत पोलिसांनाही तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अभाविपच्या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे, या घटनेनंतर काही वेळातच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आयोगाचे स्पष्टीकरण - आज आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 चा पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली माहिती चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असे स्पष्टीकरण ( MPSC on Paper Leak ) एमपीएससीच्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे देण्यात आले आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या प्रश्नसंचाचा एक सील नियमबाह्य पद्धतीने नागपुरातील एका सेंटरवर फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.