मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ४ ऑक्टोबर, २०२१ ते २ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ करीता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाकडून जाहीर करण्यात (MPSC Engineering Post Result) आला आहे. या स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये स्वप्नील पाटील, अनुजा फडतरे राज्यात प्रथम आले आहेत. एकूण आठ संवर्गातील १हजात १४५ पदांपैकी १ हजार ९४३ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहेत.
स्वप्नील पाटील, अनुजा फडतरे राज्यात प्रथम - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ४ ऑक्टोबर २०२१ ते २ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ करीता मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये स्वप्नील सुनिल पाटील बैठक क्रमांक PN001230 हे राज्यातून सर्वसाधारण तसेच मागास प्रवर्गातून प्रथम आले आहेत व अनुजा प्रभाकर फडतरे बैठक क्रमांक PNO11067 या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत. दिव्यांग व अनाथ प्रवर्गातील २ पदे रिक्त प्रस्तुत परीक्षेच्या अंतिम निकालात एकूण ११४५ उमेदवारांपैकी अनाथांसाठी आरक्षित असलेल्या दोन पदांपैकी एक पद तसेच दिव्यांग श्रवण शक्तीतील दोष या प्रवर्गाकरीता आरक्षित असलेले एक पद पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त ठेवण्यात आले आहे.
गुणांची पडताळणी करण्यासाठी आवाहन सदर परीक्षेतील अंतिम निकालात अहंताप्राप्त / शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे Online पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. असे आयोगाच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.