ETV Bharat / city

CET Exam एमपीएससी २१ ऑगस्ट तर दोन्ही परीक्षेला बसलेल्यांची सीईटी २३ ऑगस्ट रोजी होणार

author img

By

Published : Aug 17, 2022, 7:09 PM IST

राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अर्थात एमपीएससीची परीक्षा आणि शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या बीएड उमेदवारांची परीक्षा नेमकी एकाच दिवशी आयोजिली गेली आहे. CET Exam परिणामी ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा द्यावयाच्या आहेत त्यांना जरा चिंता निर्माण झाली आहे.या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांची अडचण सांगितली. त्यावर त्वरित मंत्री महोदयांनी दिलासा देण्याचा निर्णय घेतला.

फाईल फोटो
फाईल फोटो

मुंबई - राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अर्थात एमपीएससीची परीक्षा आणि शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या बीएड उमेदवारांची परीक्षा नेमकी एकाच दिवशी आयोजिली गेली आहे. परिणामी ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा द्यावयाच्या आहेत त्यांना जरा चिंता निर्माण झाली आहे. CET Exam 2022 या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांची अडचण सांगितली. त्यावर त्वरित मंत्री महोदयांनी दिलासा देण्याचा निर्णय घेतला.

सीईटी संचालक याना उपाय करण्यासाठीचे आदेश २१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात एमपीएससी आणि अध्यापक उमेदवारांची परीक्षा आहे.नेमकी एकाच तारखेला महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची देखील परीक्षा आल्याने जे अध्यापक शिक्षण घेत आहेत. MPAC on 21st August and CET on 23rd August जे सीईटी तसेच तेच एमपीएससीसाठी देखील परीक्षेला बसलेले आहेत. त्यांची मात्र मोठी अडचण झाली होती. विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हि बाब लक्षात आणून दिल्यावर त्यांनी त्वरित सीईटी संचालक याना उपाय करण्यासाठीचे आदेश दिले.

सीईटी परीक्षा २३ ऑगस्ट २०२२ रोजी या संदर्भात सीईटी महाराष्ट्र आयुक्त रवींद्र जगताप याना विचारले असता त्यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना माहिती दिली. कि मंत्री महोदयांच्या आदेशा नुसार आम्ही देखील निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही परीक्षा आहेत. जसे एमपीएस्सी तसेच बीएड साठी सीईटी त्यांना आम्ही उपाय दिला आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित आम्हाला आमच्या ईमेल आयडीवर ईमेल करावा. त्यात दोन्ही परीक्षेचे प्रवेश मूळ प्रवेश पत्र त्यांनी ईमेल सोबत जोडायचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांना १८ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजे पर्यंत मुदत दिलेली आहे. त्या मुदतीत त्यांनी अर्ज आणि कागदपत्रे अपलोड करून पाठवावी. अश्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे खात्री केल्यावर त्यांची सीईटी परीक्षा २३ ऑगस्ट २०२२ रोजी घेऊ'' असे त्यांनी नमूद देखील केले.

विद्यार्थ्यांनी त्वरित दोन्ही प्रवेश पत्र ईमेल सोबत अपलोड करावे जे विद्यार्थी बीएड शिकत आहेत. सीईटी आणि एमपीएससी दोन्हिवू परीक्षेला बसलेले आहेत. त्यांच्याचसाठी हि मुदत आणि पर्याय दिला गेल्याचं देखील सीईटी महाराष्ट्र आयुक्त रवींद्र जगताप यांनी अधोरेखित केले. शासनाच्या ह्या निर्णयामुळे चांदा ते बांदा सर्व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आता विद्यार्थ्यांनी त्वरित खालील सीईटी आयुक्त यांनी दिलेल्या ईमेल वर अर्ज करावा. higher4.cetcell@gmail.com हा तो ईमेल आहे ज्यावर विद्यार्थ्यांनी त्वरित दोन्ही प्रवेश पत्र ईमेल सोबत अपलोड करावे.

केल्याने होत आहे रे नवनियुक्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्या संदर्भात विद्यार्थाना दोन्ही परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची अडचण समजून घेऊन त्वरेने सीईटी विभागाला आदेश दिले. उच्च शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार घेतल्या घेतल्या दादांनी विद्यार्थ्यांना दिलास दिल्यामुळे विद्यार्थी संकटातून बाहेर आले आहेत. परिणामी केल्याने होत आहे रे ही मराठी म्हण सार्थ ठरते. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा नक्कीच मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

हेही वाचा - OBC Reservation केंद्राच्या शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसींना अद्यापही आरक्षण नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.