ETV Bharat / city

राणेंसारख्या घरफोड्याला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊ देणार नाही - राऊत

राणे हे दादर येथील चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. मात्र या अगोदरच शिवसेनेने राणे यांना इशारा दिला आहे.

author img

By

Published : Aug 18, 2021, 4:38 PM IST

नारायण राणे
नारायण राणे

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत केलेल्या कामांना सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाकडून देशभरात 'जन आशीर्वाद' यात्रा सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा १९ ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. राणे हे दादर येथील चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. मात्र या अगोदरच शिवसेनेने राणे यांना इशारा दिला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दादरमधील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाला राणेंना भेट देऊ देणार नाही, असे ट्विट करत त्यांनी विरोध केला आहे.

खासदार विनायक राऊतांचा इशारा

विनायक राऊत यांनी ट्विटरवरुन राणेंवर टीका केली आहे. 'नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणेंसारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाहीत,' असे ट्विट राऊत यांनी केले आहे.

खासदार विनायक राऊत यांचे ट्विट
खासदार विनायक राऊत यांचे ट्विट

असा असेल यात्रेचा प्रवास

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी भेटी देणार आहेत. टिचर्स कॉलनी, शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते दादर येथील ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत. त्यानंतर वीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी येथे दर्शन घेणार आहेत. महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, लालबागचा राजा येथे जाऊनही ते दर्शन घेणार आहेत. उद्यापासून नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू होईल आणि 26 ऑगस्टला सिंधुदुर्ग येथे त्याची समाप्ती होईल. मुंबई शहर उपनगर, वसई विरार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असा या यात्रेचा प्रवास असणार आहे.

यात्रेवर संजय राऊत यांची टीका

कोविड काळात वर्क फ्राॅम होम काळाची गरज आहे. तुम्ही ऊकिरडे फुंकत फिरत आहात, अशी टीका राऊत यांनी भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेवर केली आहे. जनआशीर्वाद यात्रेमुळे तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्याचे काम होणार आहे. जनआशीर्वाद यात्रेची काही गरज नसताना यात्रा काढली जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली होती.

हेही वाचा - भाजपाने कितीही जनआशीर्वाद यात्रा काढली, तरी जनतेची तळतळाट लागणारच - भाई जगताप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.