ETV Bharat / city

Vinayak Raut on Rana Couple : राणा दाम्पत्य येथील स्वतःच्या पायाने, पण जातील आमच्या खांद्यावरून - खासदार विनायक राऊत

author img

By

Published : Apr 22, 2022, 5:05 PM IST

Updated : Apr 22, 2022, 6:13 PM IST

राणा दाम्पत्याने (Rana Couple Hanuman Chalisa at Matoshree) उद्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्याला आता शिवसेना खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut on Rana Couple) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

mp vinayak raut
शिवसेना खासदार विनायक राऊत

मुंबई - 'शिवसेना हिंदुत्व विसरले हिंदुत्वाचे आठवण करून देण्यासाठी आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणारच' असे राणा दाम्पत्याने (Rana Couple Hanuman Chalisa at Matoshree) आज आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्याला आता शिवसेना खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut on Rana Couple) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'तुम्ही येऊन तर दाखवा, आमचे शिवसैनिक प्रसाद द्यायला तयारच आहेत', असे राऊत म्हणाले. तसेच ते येथील स्वतःच्या पायाने पण जातील आमच्या खांद्यावरून, असेही राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार विनायक राऊत

तुम्ही या आम्ही तयार आहोत - खासदार राऊत म्हणाले की, "कोण राणा दाम्पत्य? आम्ही त्यांना किंमत देत नाही. त्यांची लायकी आहे का शिवसेनेला आव्हान देण्याची? त्यांनी कितीही वाजता मातोश्रीवर यावे आमचे शिवसैनिक त्यांना प्रसाद द्यायला तयार आहेत. येथील स्वतःच्या पायाने पण जातील आमच्या खांद्यावरून. आम्ही वाट बघतोय तुमची." असा थेट इशारा शिवसेना नेते व खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. ते मातोश्री बाहेर पत्रकारांशी बोलत होते.

नेमके काय म्हणाले राणा? - खासदार नवनीत राणा यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, "आम्ही दोघेही आमच्या कार्यकर्त्यांसह उद्या सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाणार आहोत. तिथे जाऊन आम्ही हनुमान चालीसा पठण करू. आम्हाला काढून दाखवा. उद्धव ठाकरे हे आपले हिंदुत्व विसरले आहेत. ते सध्या एका वेगळ्याच दिशेने जाऊन महाराष्ट्राचं वाटोळे करू पाहात आहेत आणि म्हणून हे विघ्न दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालीसा पठण करत आहोत."

हेही वाचा - VIDEO : नंदगिरी अतिथीगृहात राणा दाम्पत्यांनी केले बुकिंग; शिवसैनिक आक्रमक

दरम्यान, राणा दाम्पत्याला मातोश्रीवर येण्यापासून अडवण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी शिवसैनिकांनी ठिय्या दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर शिवसेना नेते व खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या देण्यात येत आहे.

Last Updated : Apr 22, 2022, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.