ETV Bharat / city

'शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या?'

दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तान्हाजी सिनेमातील एक प्रसंग व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आला आहे. या प्रसंगात शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे.

modis face on shivaji maharaj face
संजय राऊत-नरेंद्र मोदी
author img

By

Published : Jan 21, 2020, 12:32 PM IST

मुंबई - दिल्लीतील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर 'पॉलिटिकल कीडा' या ट्विटर हँडलवरून तान्हाजी या सिनेमातील दृष्यांना मॉर्फिंग करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाहांचा चेहरा लावण्यात आला आहे. या प्रकारामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनीही आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना, 'शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या?' असा खोचक सवाल केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत

हेही वाचा... '...तब मेरा बाप फाँसी के तक्त को चुम के, इनक्लाब झिंदाबाद के नारे लगा रहा था'

काय म्हणाले संजय राऊत ?

खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना, या अगोदर झालेल्या वादातील काही प्रमुख लोकांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांना टोला लगावला आहे. 'राज्यात काही प्रमुख लोक आहेत. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे, असे वाटते. अशा प्रमुख लोकांनी आता या विषयावर बोलले पाहिजे. त्यांनाच याबाबत प्रश्न विचारला पाहिजे' असा टोला राऊत यांनी उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता त्यांना लगावला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तान्हाजी यांचा राजकीय वापर केला गेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर राजकीय फोटो लावून ते प्रचारात वापरले जात आहे. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काही लोकांनी हंगामा केला. त्यांनाही आपण तो व्हिडीओ पाठवला आहे. आता त्यांच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहेत, असे राऊत यावेळी म्हणाले. काही लोकांनी सातारा तर काही लोकांनी सांगली बंद केले होते. तसेच काही लोकांनी मोठमोठी वक्तव्ये केली होती. त्यांनीही यावर बोलावे, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पाहणार 'तान्हाजी' चित्रपट

'छत्रपती शिवाजी महाराज विश्वाचे युगपुरुष आहे. ते आमचे दैवत आहेत. आमचा जीव जाईल पण आम्ही छत्रपतींचा अपमान कधी केला नाही. मात्र, जर इतर कोणी करत असेल आणि विनाकारण आम्हालाच प्रश्न विचारत असतील तर, हंगामा करणार 'ते' गप्प का?' असा सवाल राऊत यांनी केला.

Intro:Body:

संजय राऊत बाईट

*ऑन तानाजी शिवाजी शाह मोदी चेहरा*

छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तान्हाजी यांचा राजकीय वापर केलाय

त्यांच्या चेहऱ्यावर राजकीय फोटो लावून  प्रचारात ते लावल जात आहे

चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काही लोकांनी हंगामा केलेला मी त्यांना तो पाठवला आहे, आता त्यांच्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे

काही लोकांनी सातारा बंद केलेला, काही लोकांनी सांगली बंद केलं होतं, काही लोकांनी मोठी वार्ता केली होती, त्यांनी यावर बाेलावे

छत्रपती शिवाजी महाराज विश्वाचे युगपुरुष आहे, आमचं दैवत आहे. आमची जीव जाईल पण छत्रपतींचा अपमान हा कधी केलाय नाहीय, जर कोणी करत आले आणि विनाकारण आम्हाला प्रश्न विचारत असतील तर ते गप्प का?

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.