मुंबई - उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ येतील हे आधीच स्पष्ट झाले होते, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तरप्रदेश निकालावर दिली आहे. उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. यावर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ हेच पुन्हा सत्तेवर येथील हे आधीच स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले राऊत?
आता मतमोजणी सुरू झाली, त्यामुळे पोस्टल मतदानावर जरा संयमाने बोलायला हवे. यूपीत अजून वीस वीस फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. उत्तरप्रदेशमध्ये योगी पुढे जातील हे आधीच स्पष्ट झाले होते. या निवडणुकीत अखिलेश यादव यांनीसुद्धा त्यांना चांगली टक्कर दिली आहे. अखिलेश यांची कामगिरी देखील चांगली आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांची आघाडी टक्कर देते, असे राऊत यांनी म्हटले आहे.
राऊतांच्या यूटर्न -
राऊत यांनी उत्तरप्रदेशमध्ये योगी येतील हे आधीच स्पष्ट होते असे म्हटल्याने त्यांनी त्यांच्याच वक्तव्यावरुन यूटर्न घेतल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक काळात राऊत म्हणाले होते की उत्तरप्रदेशमधील एकूण वातावरण बघता तिथे बदल निश्चित होईल. असे राऊत यांनी म्हटले होते. पाचही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल संध्याकाळपर्यंत स्पष्ट होतील. यात सर्वात जास्त लक्ष हे उत्तरप्रदेशच्या निकालाकडे लागले आहे.