मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या घरापुढे हनुमान चालीसा पठण प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने अटक केलेल्या युसुफ लकडावाला (Yusuf Lakdawala ) याच्याकडून नवनीत राणांनी 80 लाखांचे कर्ज घेतले, असा गंभीर आरोप पुराव्यास शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे.
-
नवनीत राणा ने युसुफ लकड़ावाला से ₹80 लाख का लोन लिया था,जिनकी जेल में मौत हो गई थी।उसी लकड़ावाला को @dir_ed ने मनी लॉन्ड्रिंग मामले में गिरफ्तार किया था व उसके डी गैंग से संबंध भी थे।
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मेरा सवाल-क्या ED ने इसकी जांच की ? राष्ट्रीय सुरक्षा का मामला है! @KiritSomaiya @sanjayp_1 pic.twitter.com/u0h8cmT0He
">नवनीत राणा ने युसुफ लकड़ावाला से ₹80 लाख का लोन लिया था,जिनकी जेल में मौत हो गई थी।उसी लकड़ावाला को @dir_ed ने मनी लॉन्ड्रिंग मामले में गिरफ्तार किया था व उसके डी गैंग से संबंध भी थे।
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 26, 2022
मेरा सवाल-क्या ED ने इसकी जांच की ? राष्ट्रीय सुरक्षा का मामला है! @KiritSomaiya @sanjayp_1 pic.twitter.com/u0h8cmT0Heनवनीत राणा ने युसुफ लकड़ावाला से ₹80 लाख का लोन लिया था,जिनकी जेल में मौत हो गई थी।उसी लकड़ावाला को @dir_ed ने मनी लॉन्ड्रिंग मामले में गिरफ्तार किया था व उसके डी गैंग से संबंध भी थे।
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 26, 2022
मेरा सवाल-क्या ED ने इसकी जांच की ? राष्ट्रीय सुरक्षा का मामला है! @KiritSomaiya @sanjayp_1 pic.twitter.com/u0h8cmT0He
नवनीत राणांनी घेतले 80 लाखांचे कर्ज - खासदार नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतले होते, ज्याचा तुरुंगात मृत्यू झाला होता. याच लखडावालाला ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती आणि त्याचे डी गँगशी संबंध होते. आता माझा सवाल आहे की, ईडीने याची चौकशी केली का? राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे!, असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यामुळे या प्रकाराला आता नवे वळण लागण्याची शक्यता आहे..
संजय राऊत यांचा गंभीर आरोप - युसुफ लकडावाला याला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने अटक केली होती, त्यावेळी त्याचे डी गँग अर्थात अंडरवर्ल्डशी संबंध होते. मग या प्रकरणाची ईडी चौकशी करणार का? हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी पुराव्याचे फोटोसुद्धा ट्विट केले आहेत.
हेही वाचा : हेही वाचा - Stone Pelting CCTV Footage : राणा यांच्या घरावर दगडफेक करणारी व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद