मुंबई- दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन देलकर यांनी मुंबईतील सी ग्रीन या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्याच्या अगोदर त्यांनी सहा पानांची गुजराती भाषेत सुसाईड नोट लिहिलेली होती. या सुसाईड नोटमध्ये दादरा नगर हेवेलीमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत वाद सुरू असल्याचा उल्लेख आढळून आला आहे.
काय म्हटले आहे सुसाईड नोटमध्ये
आपण या अधिकाऱ्यांशी चर्च करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हे अधिकारी आपलं ऐकूण घेत नव्हते, असाही उल्लेख या सुसाईड नोटमध्ये असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दादरा नगर हवेलीचे काही प्रशासकीय अधिकारी आणि देलकर यांच्यामध्ये वाद सुरू होते, आणि यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे. याचबरोबर त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये अन्य काही बाबिंचा देखील उल्लेख केला आहे. खासदार मोहन देलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली, त्यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली असून, आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. देलकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.