मुंबई - उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. यंदाच्या निवडणुकीत भाजपतर्फे गोपाळ शेट्टी यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात येणार आहे.
भाजपने धुलीवंदनाच्या दिवशी पहिली यादी जाहीर केली. या यादीत विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नावाचाही समावेश आहे. उमेदवारी घोषित झाल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मागील लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात भाजपचे ४, काँग्रेसचा व शिवसेनेचा १ आमदार आहे.