ETV Bharat / city

टाळेबंदीत सर्वाधिक सायबर गुन्हे ‘या’ जिल्ह्यात - महाराष्ट्र सायबर गुन्हे न्यूज

अफवा पसरविल्याने सामाजिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. हे टाळण्यासाठी गुन्हेगारांविरोधात सायबर विभागाने कारवाई केली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jun 29, 2020, 2:49 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटातही राज्यात समाज माध्यमांवर अफवा पसरवीत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक मोठ्या प्रमाणावर करत आहेत. अशा गुन्हेगारांच्या विरोधात महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात टाळेबंदीच्या काळात सर्वाधिक ५२ सायबर गुन्हे बीड जिल्ह्यात नोंदविले गेले आहेत. टाळेबंदीच्या काळात तब्बल ५०७ सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी २६२ व्यक्तींना अटक केली आहे.

अफवा पसरविल्याने सामाजिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. हे टाळण्यासाठी गुन्हेगारांविरोधात सायबर विभागाने कारवाई केली आहे.

राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी व्हॉट्सअप मेसेजे पाठविल्या प्रकरणी १९६ गुन्हे दाखल झाले आहेत. तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी २११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत टिक टॉकसारख्या समाज माध्यमांवर व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी २७ गुन्हे दाखल झाले आहेत. तर आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी १० गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर ऑडिओ क्लिप्स व युट्युबसारख्या अन्य समाज माध्यमाचा गैरवापर केल्याप्रकरणी ५९ गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल करण्यात आलेल्या या सर्व गुन्ह्यात 255 आरोपींना अटक झाली आहे.

जिल्हानिहाय दाखल सायबर गुन्हे

टाळेबंदीत सर्वाधिक ५२ सायबर गुन्हे बीड जिल्ह्यात नोंदविले गेले आहेत. या नंतर पुणे ग्रामीण भागात ४५ , जळगाव ३४, मुंबई २९ ,नाशिक ग्रामीण १८ , कोल्हापूर १७ , ठाणे शहर, १७ , बुलढाणा १५ अशी नोंद झाली आहे. तर सांगली १५ , सातारा १४ , जालना १३, नांदेड १३, नवी मुंबई १३ , अहमदनगर १३ , नाशिक शहर १३, ठाणे ग्रामीण १३ , पालघर ११, नागपूर शहर ११, लातूर १ असे सायबर गुन्हे घडले आहेत. शहरासह ग्रामाणी भागातही सायबर गुन्हे वाढले आहेत. परभणी ९ , सिंधुदर्ग ८, हिंगोली ८,अमरावती ८, चंद्रपूर ८, पुणे शहर ६, सोलापूर ग्रामीण ५, गोंदिया ५, भंडारा ५, पिंपरी चिंचवड ५ ,धुळे ५ , रत्नागिरी ४ मध्ये सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ नागपूर ग्रामीण ४ ,अमरावती ग्रामीण ४ , सोलापूर शहर ४, वर्धा ३, रायगड २ ,वाशीम २ , नंदुरबार २ ,उस्मानाबाद २ , औरंगाबाद २ , यवतमाळ १, अकोला १ ,औरंगाबाद ग्रामीण १ अशा गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.