मुंबई - मुंबई महापालिकेकडून सर्वात स्वच्छ पाणी देण्याचा दावा केला जातो. मात्र गेल्या वर्षभरात पालिकेकडे तब्बल 11 हजार दूषित पाण्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी या अंधेरी, मालाड, कुर्ला, कांदिवली, बोरिवली, भांडुप आणि घाटकोपर येथून दाखल झाल्या आहेत.
सात धरणातून पाणीपुरवठा - मुंबईकर नागरिकांना मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या धरणातून रोज 3850 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो. मुंबईकरांना हे पाणी विशेष करून ठाणे जिल्ह्यात बांधलेल्या धरणातून येते. हे पाणी नागरिकांपर्यंत स्वच्छ करून पाठवले जात असले तरी काही विभागात गढूळ आणि दूषित पाणी येते. अशा विभागातील पाणी तपासणीसाठी पालिकेच्या प्रयोग शाळेत पाठवले जाते. त्याठिकाणी हे पाणी दूषित आहे का याची तपासणी केली जाते.
दूषित पाण्याच्या तक्रारी - मुंबई महापालिकेकडे 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या एक वर्षाच्या कालावधीत दूषित पाण्याच्या 10 हजार 829 तक्रारी नोंद झाल्या आहेत. यापैकी 10 हजार 310 तक्रारींचे निवारण झाले आहे. तर 519 तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात सर्वाधिक अंधेरी पश्चिम येथे 1040, अंधेरी पूर्व येथे 1001, मालाड येथे 704, कुर्ला 665, कांदिवली 628, बोरिवली 628, भांडुप 525, घाटकोपर 519 तक्रारी दाखल झाल्याची माहिती पालिकेच्या जल विभागाने दिली.
तरीही काळजी घ्या - नागरिकांना 80 टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. दूषित पाण्यामुळे पाण्यासारखे शौचास होणारा अतिसार, कावीळ, उलटी व जुलाब होणारा गॅस्ट्रो असे आजार होतात. यामुळे नागरिकांनी आपल्याला येणारे पाणी स्वच्छ असले तरी गाळून आणि उकळून प्यावे असे आवाहन पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी केले.
मुंबईत "या" विभागात सर्वाधिक दूषित पाण्याच्या तक्रारी
मुंबई महापालिकेकडे 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या एक वर्षाच्या कालावधीत दूषित पाण्याच्या 10 हजार 829 तक्रारी नोंद झाल्या आहेत. यापैकी 10 हजार 310 तक्रारींचे निवारण झाले आहे. तर 519 तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात सर्वाधिक अंधेरी पश्चिम येथे 1040, अंधेरी पूर्व येथे 1001, मालाड येथे 704, कुर्ला 665, कांदिवली 628, बोरिवली 628, भांडुप 525, घाटकोपर 519 तक्रारी दाखल झाल्याची माहिती पालिकेच्या जल विभागाने दिली.