ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 2,287 नवे रुग्ण, 47 रुग्णांचा मृत्यू, 2347 रुग्णांची कोरोनावर मात - कोरोना बातम्या

आज मुंबईत कोरोनाच्या 2287 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 2347 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Oct 9, 2020, 10:32 PM IST

मुंबई - मुंबईत मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज मुंबईत कोरोनाच्या 2287 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 2347 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत आज (शुक्रवारी) कोरोनाचे 2287 नवे रुग्ण आढळून आले असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 36 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 37 पुरुष तर 10 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 25 हजार 048 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 340 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 2347 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 89 हजार 022 वर गेला आहे. सध्या मुंबईत 23 हजार 086 सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा - मराठा क्रांती मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला आजपासून सुरुवात.. 'भीक नाही, हक्क मागतोय; गरज पडली तर तलवारी हातात घेऊ'

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 67 दिवस तर सरासरी दर 1.03 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 643 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 863 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 12 लाख 32 हजार 838 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.