मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या (Covid Patient) आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसांत 1 हजाराच्या दरम्यान रुग्ण (Corona Update) आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आज शुक्रवारी 664 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 915 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.71 टक्के, तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
सद्यस्थितीत 7,132 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 664 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 37 हजार 289 वर पोहचला आहे. तर आज 16 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 41 हजार 149 वर पोहचला आहे. आज 915 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 85 हजार 335 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.71 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 58 लाख 39 हजार 692 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी
10.8 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 79 हजार 919 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 7 हजार 132 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
- मुंबई महापालिका - 193
- ठाणे पालिका - 30
- नवी मुंबई पालिका - 35
- कल्याण डोबिवली पालिका - 22
- वसई विरार पालिका - 13
- पनवेल पालिका - 20
- नाशिक - 10
- नाशिक पालिका - 15
- अहमदनगर - 31
- पुणे - 49
- पुणे पालिका - 84
- पिंपरी चिंचवड पालिका - 35
- सातारा - 13
या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
25 ऑक्टोबर रोजी कोरोना रुग्णांमध्ये घट होऊन 889 रुग्ण आढळले. तर 1 नोव्हेंबरला 809, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982,
11 नोव्हेंबरला 997, 22 नोव्हेंबरला 656, 23 नोव्हेंबरला 766, 25 नोव्हेंबरला 848, 26 नोव्हेंबरला 852, 28 नोव्हेंबरला 832, 29 नोव्हेंबरला 536, 30 नोव्हेंबरला 678, 1 डिसेंबरला 767, 2 डिसेंबरला 796, 3 डिसेंबरला 664 असे सर्वात कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - Assembly Speaker Election : हिवाळी अधिवेशनातच अध्यक्षपदाची निवड, तो काँग्रेसचाच असेल - नाना पटोले