ETV Bharat / city

परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली; ५० हजारपेक्षा जास्त कर्मचारी संपात सहभागी! - परिवहन मंत्र्यांच्या आव्हानाला केराची टोपली

परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना भूलथापांना बळी न पडता सर्व संपकरी कामगारांनी १० मार्च २०२२ पर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन केले. याशिवाय कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई ( ST Employee issues in Maharashtra ) मागे घेण्यात येईल, अशी घोषणाही अनिल परब यांनी केली ( Anil Parab on ST strike ) होती. मात्र या आवाहनाला आंदाेलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. .

एसटी कर्मचारी संप
एसटी कर्मचारी संप
author img

By

Published : Mar 14, 2022, 8:59 PM IST

Updated : Mar 14, 2022, 10:33 PM IST

मुंबई - एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नाही, असा राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने अहवाल दिल्यानंतरही परिस्थिती ( committee report on ST ) बदलली नाही. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सर्व संपकरी कामगारांनी १० मार्च २०२२ पर्यंत कामावर रुजू व्हावे,असे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाला केराची टोपली दाखवत एसटी कर्मचारी ५० हजारपेक्षा जास्त कर्मचारी ( ST employees strike ) संपावर ठाम आहे.

३१ हजार ६० कर्मचारी कामावर-
परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना भूलथापांना बळी न पडता सर्व संपकरी कामगारांनी १० मार्च २०२२ पर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन केले. याशिवाय कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई ( ST Employee issues in Maharashtra ) मागे घेण्यात येईल, अशी घोषणाही अनिल परब यांनी केली ( Anil Parab on ST strike ) होती. मात्र या आवाहनाला आंदाेलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.

५० हजारपेक्षा जास्त कर्मचारी संपात सहभागी

हेही वाचा- ST Worker Strike : आज एसटी महामंडळाने केले २४३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ; ८ हजार ६७ जणांना बजावल्या नोटीस!

एसटीचेही माेठे नुकसान

महामंडळाचा एकूण ८१ हजार ६८३ कर्मचाऱ्यांपैकी फक्त ३१ हजार ६० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. याशिवाय विविध सामाजिक माध्यमांतून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये अफवा पसरल्या आहेत. या अफवांवर एसटी कर्मचारी विश्वास ठेवत आहेत. त्यामुळे मंत्र्यांच्या आवाहनानंतरही ते रुजू हाेण्यास तयार नाहीत. यामुळे त्यांच्यासह एसटीचेही माेठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा -ST Strike : शरद पवार मैदानात म्हणजे माझी हत्या होऊ शकते; गुणरत्न सदावर्ते यांचे खळबळजनक वक्तव्य

बडतर्फ किंवा निलंबित असल्यास करावा लागेल अर्ज-
संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फ किंवा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्या कर्मचाऱ्यांना रूजू व्हायचे असेल तर त्यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे अपील करावे लागेल. डीपीओ, यंत्र अभियंता व विभागीय नियंत्रक यांचा समावेश असलेली समिती निर्णय घेईल. अर्ज केल्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले जाईल. त्यानंतरच रूजू करून घेतले जाणार आहे.

हेही वाचा-ST Bus Strike : संपामुळे एसटी महामंडळात नोकर भरती; प्रतीक्षा यादीवरील 50 उमेदवारांना घेतले नोकरीत

अशी आहे आकडेवारी -

  • प्रशासकीय कर्मचारी - ११ हजार ९८९ पैकी १० हजार ७४६ कर्मचारी हजर ( प्रत्यक्षात संपात सहभागी १ हजार २४३)
  • कार्यशाळा कर्मचारी १५ हजार ७२१ पैकी ८ हजार ६६२ कर्मचारी हजर ( प्रत्यक्षात संपात सहभागी ७ हजार ५९ )
  • एसटी चालक २९ हजार ३०३ पैकी ५ हजार ९८१ कर्मचारी हजर ( प्रत्यक्षात संपात सहभागी २३ हजार ६२३ )
  • एसटी वाहक २४ हजार ६७० पैकी ५ हजार ९८१ हजर ( प्रत्यक्षात संपात सहभागी १८ हजार ६८९ )

Last Updated : Mar 14, 2022, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.