मुंबई - राज्यात कोरोनाचा उद्रेक ( Corona Patient Increased In Maharashtra ) दिवसेंदिवस वाढतो आहे. आज 24 तासामध्ये सुमारे 41 हजार 434 कोरोना बाधितांची नोंद ( Maharashtra todays Corona Patient ) झाली आहे. 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर दिवसभरात 9 हजार 671 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुसरीकडे ओमायक्रोनचा प्रसार ( Omicron In Maharashtra ) देखील वाढला असून आज 133 रुग्ण राज्यभरात आढळून आले. सक्रिय रुग्ण देखील दीड लाखाच्या ( Active Corona Patient in Maharashtra ) घरात असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
आज 41 हजार 434 कोरोना बाधितांची नोंद -
मागील दहा दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रोनचे रुग्ण राज्यभरात सापडत आहेत. गेल्या तीन दिवसांत भरमसाठ रुग्णवाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज 41 हजार 434 कोरोना बाधितांची नोंद झाली. राज्यात यामुळे 68 लाख 75 हजार 753 इतकी आहे. तर 9 हजार 671 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 57 हजार 81 इतका आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 95.37 टक्के इतका आहे. दिवसभरात 13 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून मृत्यूदर घटून 2.5 टक्के इतका आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 3 लाख 42 हजार 173 चाचण्या केल्या. या चाचण्यांपैकी 09.77 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 8 लाख 45 हजार 89 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 1851 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. 1 लाख 73 हजार 238 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
आज 133 ओमायक्रॉन बाधित -
राज्यात आज 133 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी 130 रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने आणि 3 रुग्ण गुजरात राज्याने रिपोर्ट केले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 1 हजार 9 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी 439 रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात नोंद झालेल्या 133 रुग्णांमध्ये पुणे मनपा–118, पिंपरी चिंचवड–8
पुणे ग्रामीण-3, वसई विरार-2, अहमदनगर आणि मुंबई प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे.
विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
- मुंबई महापालिका - 20318
- ठाणे - 999
- ठाणे मनपा - 3092
- नवी मुंबई पालिका - 2439
- कल्याण डोबिवली पालिका - 1307
- वसई विरार पालिका - 1257
- नाशिक - 216
- नाशिक पालिका - 846
- अहमदनगर - 126
- अहमदनगर पालिका - 93
- पुणे - 794
- पुणे पालिका - 2521
- पिंपरी चिंचवड पालिका - 1075
- सातारा - 282
- नागपूर मनपा - 577
ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण
- मुंबई - 566
- पुणे मनपा - 201
- पिंपरी चिंचवड - 53
- ठाणे मनपा - 36
- नागपूर - 30
- पुणे ग्रामीण - 32
- पनवेल - 17
- नवी मुंबई - 10
- कोल्हापूर - 10
- सातारा - 8
- कल्याण - डोंबिवली - 7
- उस्मानाबाद - 6
- भिवंडी - 5
- वसई-विरार - 4
- नांदेड, अमरावती, उल्हासनगर - 3 प्रत्येकी
- औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर, सांगली - प्रत्येकी 2
- लातूर, अहमदनगर, अकोला, रायगड - प्रत्येकी 1