ETV Bharat / city

मुंबईत आज 28 हजार 421 लाभार्थ्यांचे लसीकरण - मुंबई लसीकरण बातमी

मुंबईत आज (दि. 31 मार्च) मुंबईत 28 हजार 421 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 11 लाख 52 हजार 974 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरण
लसीकरण
author img

By

Published : Mar 31, 2021, 10:10 PM IST

मुंबई - मार्च, 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज (दि. 31 मार्च) मुंबईत 28 हजार 421 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 11 लाख 52 हजार 974 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी

मुंबईत आज (दि. 31 मार्च) 28 हजार 421 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 25 हजार 215 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 206 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 11 लाख 52 हजार 974 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 10 लाख 2 हजार 5 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 50 हजार 969 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 45 हजार 794 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 50 हजार 793 फ्रंटलाईन वर्कर, 5 लाख 53 हजार 520 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या 1 लाख 2 हजार 868 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

असे झाले लसीकरण

मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज (दि. 31 मार्च) 14 हजार 354 तर आतापर्यंत 7 लाख 85 हजार 665 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज (बुधवार) 3 हजार 403 लाभार्थ्यांना तर एकूण 61 हजार 214 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 10 हजार 673 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 3 लाख 6 हजार 096 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरणाची आकडेवारी

आरोग्य कर्मचारी2 लाख 45 हजार 793
फ्रंटलाईन वर्कर2 लाख 50 हजार 793
ज्येष्ठ नागरिक5 लाख 53 हजार 520
45 ते 59 वयोगट1 लाख 2 हजार 868
एकूण11 लाख 52 हजार 974

हेही वाचा - ड्रीम्स मॉल दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा - स्थायी समितीत मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.