ETV Bharat / city

महापालिकेच्या शाळांमध्ये तब्बल ११,५०० पेक्षा अधिक नवीन प्रवेश

author img

By

Published : Apr 30, 2022, 4:57 PM IST

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात येत असलेल्या मोफत व दर्जेदार शिक्षणाच्या निरनिराळ्या सुविधा तसेच राबविण्यात येत असलेले विविधांगी उपक्रम याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी ‘मिशन अॅडमिशन, एकच लक्ष्य - एक लक्ष’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याला पालकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्यांना सर्वोत्कृष्ट असे शिक्षण देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असून तो यशस्वी करण्याचा निर्धार महानगरपालिका प्रशासनाने केला आहे, असे सहआयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार यांनी सांगितले.

more than 11500 new admissions in municipal schools at mumbai
महापालिकेच्या शाळांमध्ये तब्बल ११,५०० पेक्षा अधिक नवीन प्रवेश

मुंबई - मुंबई महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुर असून यंदा १ लाख नवीन प्रवेश करण्याचे ध्येय शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. त्यासाठी "मिशन ऍडमिशनः एकच लक्ष्य - एक लक्ष" ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यापासून तब्बल ११ हजार ५४९ नवीन प्रवेश घेण्यात आले आहेत.

शाळांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ - राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई पब्लिक स्कूलमध्ये नाविण्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत चौफेर प्रगतीची संधी देणाऱ्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी शाळांच्या इमारती, अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक सुविधा, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर उपक्रम या सर्वंच बाबींमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. याचा परिणाम म्हणून महानगरपालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ लागली आहे.

३१ जुलैपर्यंत प्रवेश - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा ८ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१५० शाळांमध्ये मिळून ३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही विद्यार्थी संख्या गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २९ हजारने वाढली आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये १८ एप्रिल २०२२ पासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रामुख्याने बालवाडी (नर्सरी) ते पहिली, दुसरी वर्गांमधील प्रवेश पालकांकडून सध्या निश्चित केले जात आहेत. जसेजसे इयत्तांचे निकाल लागतील, तसेतसे मुंबई पब्लिक स्कूलमधील इतर इयत्तांमधील प्रवेश देखील वाढीस लागतील. पहिल्या पाच दिवसांमध्येच सुमारे ११ हजार ५४९ प्रवेश निश्चित झाले असल्याने १ लाख नवीन प्रवेशाचे लक्ष्य गाठले जाईल. प्रतिवर्षाप्रमाणे ३१ जुलैपर्यंत महानगरपालिका शाळांमधील खात्रीशीर नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू राहील असे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

१ लाख प्रवेशाचे लक्ष - बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात येत असलेल्या मोफत व दर्जेदार शिक्षणाच्या निरनिराळ्या सुविधा तसेच राबविण्यात येत असलेले विविधांगी उपक्रम याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी ‘मिशन अॅडमिशन, एकच लक्ष्य - एक लक्ष’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याला पालकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्यांना सर्वोत्कृष्ट असे शिक्षण देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असून तो यशस्वी करण्याचा निर्धार महानगरपालिका प्रशासनाने केला आहे, असे सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांनी सांगितले.

या बोर्डाच्या शाळाही सुरू होणार - महानगरपालिकेच्या शाळांमधील दहावी (एस.एस.सी.) बोर्ड परीक्षेचा निकाल सन २०१९ च्या ५३.१४ टक्के निकालावरून सन २०२० मध्ये थेट ९३.२५ टक्के व सन २०२१ मध्ये १०० टक्के निकाल लागला आहे. अन्य बोर्डातील शाळांकडे पालकांचा वाढता कल विचारात घेऊन महापालिकेने सी.बी.एस.ई. बोर्डच्या ११, आय.सी.एस.ई. बोर्डची १ शाळा सुरु केली आहे. या शाळांना दिल्ली बोर्डाची संलग्नता प्राप्त झाली आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात आय. बी. (I. B. - International Baccalaureate) बोर्डची शाळा सुरू केली जाणार आहे.त्यासोबतच, माटुंगा येथील एल. के. वाघजी महानगरपालिका शालेय इमारतीमध्ये केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नीत आय.जी.सी.एस.ई. (IGCSE - International General Certificate of Secondary Education ) बोर्डची शाळा सुरू होत आहे. अशा या १४ शाळांमध्ये मिळून जवळपास ८०० प्रवेश जागा असून त्यासाठी मोठ्या संख्येने मिळणारा प्रतिसाद हे सर्व प्रवेश निश्चित आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.