ETV Bharat / city

मोसमी वारे परतले, मात्र पावसाचा जोर कायम;अनेक जिल्ह्यांत धरणं ओव्हरफ्लो

राज्यातून मोसमी वारे परतले असले तरी आंध्रप्रदेश या किनारपट्टीच्या भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राज्यांवर याचा परिणाम जाणवू लागला आहे. केरळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील परभणी आणि विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा आदी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. आज विदर्भात चंद्रपूर, अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Oct 17, 2021, 12:06 PM IST

मुंबई - ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे. मात्र, पावसाळा काही थांबायचे नाव घेत नाही. महाराष्ट्रात आजही काही जिल्ह्यांची मुसळधार पाऊस कोसळत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. दरम्यान, आजही मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटात पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

राज्यातून मोसमी वारे परतले असले तरी आंध्रप्रदेश या किनारपट्टीच्या भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राज्यांवर याचा परिणाम जाणवू लागला आहे. केरळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडय़ातील परभणी आणि विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा आदी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. आज विदर्भात चंद्रपूर, अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

ऑक्टोबर हीट चा परिणाम

राज्यात ऑक्टोबर हीटचा परिणामी दिसू लागला आहे. पुढील दोन दिवस पावसाची स्थिती कायम राहील. मात्र, त्यानंतर हवामान कोरडे होईल. यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील तापमान आणखी वाढेल. काल राज्यातील उच्चांकी तापमान ब्रह्मपुरी येथे ३६.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

केरळला पावसाचा जोरदार फटका

दक्षिण आणि मध्य केरळमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. काल पावसाचा जोरदार फटका केरळमधील काही भागाला बसला आहे. पावसामुळे आलेला पूर आणि दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण बेपत्ता आहेत. परतीच्या पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा - देशातील सर्वात प्रदूषित परिसर आहे 'लोणी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.