ETV Bharat / city

ISIS Terrorist : दहशतवादी कारवायांसाठी उकसवले; आरोपी मोहम्मद शहीद खानला विशेष एनआयए न्यायालयाकडून सात वर्षाची शिक्षा - एनआयए न्यायालयाने सुनावली दहशतवाद्याला शिक्षा

दहशतवादी मोहम्मद शाहीद खानवर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीसह कटकारस्थान, प्रक्षोभक चिथावणी, दिशाभूल करणे असे आरोप ठेवण्यात आले होते. परभणीत राहणाऱ्या खानवर 2016 मध्ये हे आरोप निश्‍चित केले होते. त्याच्यावर ऑक्टोबर 2017 मध्ये आरोपपत्र ठेवण्यात आले.

special NIA court
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 28, 2022, 11:40 AM IST

मुंबई - विशेष एनआयए न्यायालयाने इसीसचा ( ISIS ) दहशतवादी मोहम्मद शाहीद खान उर्फ ​​लाला याला भारतीय तरुणांना ऑनलाईन पद्धतीने चिथावणी दिल्याच्या आरोपात दोषी ठरवले आहे. त्याला या गुन्ह्यासाठी 7 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे. शिक्षा सुनावताना न्यायालयाने आरोपीला 45 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

ऑनलाईन पद्धतीने दहशतवादी कारवायांसाठी दिली चिथावणी

दहशतवादी मोहम्मद शाहीद खानवर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीसह कटकारस्थान, प्रक्षोभक चिथावणी, दिशाभूल करणे असे आरोप ठेवण्यात आले होते. परभणीत राहणाऱ्या खानवर 2016 मध्ये हे आरोप निश्‍चित केले होते. त्याच्यावर ऑक्टोबर 2017 मध्ये आरोपपत्र ठेवण्यात आले. यामधील अन्य एक आरोपी नासीर यफाईला न्यायालयाने नुकतीच 7 वर्षे सक्तमजुरीची सजा सुनावली आहे. स्वतःची ओळख लपवून युवकांना ऑनलाईन पद्धतीने दहशतवादी कारवायांसाठी चिथावणी देण्यात आल्याचा आरोप एनआयएने त्याच्यावर ठेवला आहे.

भारतीय तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा कट - तक्रारदाराने खान विरुद्ध केस स्थापित केल्याची माहिती न्यायालयाने यावेळी दिली आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कायद्याच्या कलम 13, 16, 18, 20, 38, 39, आयपीसीच्या कलम 120-बी आणि कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्फोटक पदार्थ कायदा, 5, 6 अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी दोषी असल्याचे कलमही त्याच्यावर लावण्यात आले. हे प्रकरण सीरियातील आयएसआयएसच्या कार्यकर्त्यांनी इंटरनेटद्वारे भारतीय तरुणांना कट्टरपंथी बनविण्याच्या कटाशी संबंधित आहे. या प्रकरणात त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर आयईडी गोळा करण्यात आला होता.

नासेर बिन याफईलाही सुनावली होती शिक्षा - 2016 मध्ये मुंबईच्या एटीएस पोलीस ठाण्यात सुरुवातीला हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नंतर तपास एनआयएने ताब्यात घेतला. तपासानंतर ऑक्टोबर 2016 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने यापूर्वी मार्च 2022 मध्ये या प्रकरणातील आणखी एक आरोपी नासेर बिन याफई (चौस) याला 7 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.