मुंबई - 'गुजरात सुद्धा भारताचा भाग आहे. तिथे देखील नुकसान झाले आहे. गुजरातला जर हजार कोटी दिले तर कोणत्या राज्याला आणि महाराष्ट्राला दुःखी होण्याचे काही कारण नाही. विश्वास आहे, जर गुजरातला १००० कोटी रु. दिले आहेत, तर लवकरच गोव्याला 500 कोटी तर महाराष्ट्राला १५०० कोटी मिळतील', असा उपरोधिक टोला संजय राऊत यांनी मोदींना लगावला आहे.
'पंतप्रधान मोठ्या मनाचे व्यक्ती'
ते पुढे म्हणाले की, 'पंतप्रधान मोदी मोठ्या मनाचे व्यक्ती आहेत. महाराष्ट्राचे कशाप्रकारे नुकसान झाले आहे, हे त्यांना माहित आहे. त्यामुळे ते मदत करतील', तसेच 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील कोकण दौऱ्यावर आहेत. त्या भागाची पाहणी करतील व ते सुध्दा केंद्राला सांगतील की, महाराष्ट्राला कमीत कमी दीड हजार कोटी रुपये मिळाले पाहिजेत. मला विश्वास आहे की, महाराष्ट्र आणि गोव्याचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे केंद्राकडून दोन्ही राज्यांना मदत होईल, असेही राऊत पत्रकारांशी बोलतांना म्हणाले आहेत.
हेही वाचा - ओएनजीसीला वादळाची कल्पना होती; मग कर्मचाऱ्यांना बार्जवर ठेवलेच का? - नबाव मलिक