ETV Bharat / city

कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी आणि हतबल - नवाब मलिक - Nawab Malik on modi government

कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असून हतबलही झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज केला.

Nawab Malik
नवाब मलिक
author img

By

Published : May 8, 2021, 2:57 PM IST

Updated : May 8, 2021, 3:09 PM IST

मुंबई - आज देशामध्ये दरदिवशी ४ लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. ही कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असून हतबलही झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज केला.

माहिती देताना मंत्री नवाब मलिक

हेही वाचा - मुंबईत दोन कुटुंबांमध्ये फ्री स्टाईल मारामारी, बायाही उतरल्या मैदानात, बघा व्हिडिओ

केंद्राचा लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प

राज्यांना ऑक्सिजन साठा निश्चित केल्यानंतरही दिला जात नसल्याची सत्य परिस्थिती आहे. दोन दिवसापासून कर्नाटकच्या प्लांटमधून येणारा ५० टँकरचा कोटा राज्याला मिळेनासा झाला आहे. रेमडेसिवीरचा साठा देऊनही वेळेत वितरीत करता येत नाही, असेही मलिक म्हणाले. लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प झाला आहे. पहिला डोस घेतलेले साडेचार लाख लोक आहेत. ते दुसरा डोस घेण्यास पात्र असताना डोस देता येत नाही. शिवाय राज्य सरकारने ठरवलेल्या कार्यक्रमासाठी कंपन्यांकडून लस मिळत नसल्याचे मलिक म्हणाले.

रेमडेसिवीरचा साठा तात्काळ द्या

सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने कोरोना परिस्थितीसंदर्भात आदेश देऊन केंद्र सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. मात्र, केंद्र सरकार यामध्ये हतबल झाल्याचे दिसून येत आहे. मोदी सरकार फक्त भाषणे आणि घोषणा करणे व वेळकाढूपणा करणे ही भूमिका घेत आहे. आम्हाला ऑक्सिजन मिळत नाही, रेमडेसिवीर वेळेत पुरवठा होत नाही, आता साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाही. जाणूनबुजून केंद्र सरकार अन्याय करतेय की, केंद्र सरकारला काम करता येत नाही असा टोलाही मलिक यांनी लगावला. दरम्यान, लवकरात लवकर लस द्या, ५० टन ऑक्सिजन कोटा पडून आहे. रेमडेसिवीरचा साठा तात्काळ द्या, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

हेही वाचा - सोलापूरमधील माळशिरस पंढरपूर, करमाळा ठरतोय कोरोना हॉटस्पॉट

Last Updated : May 8, 2021, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.