ETV Bharat / city

रात्री आम्ही लोकलमध्ये झोपायला जायचं का?, प्रवासी आक्रमक - उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

लोकल प्रवाशांना ठरावीक वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्यामुळे उपनागरातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

लोकल
author img

By

Published : Feb 4, 2021, 7:43 PM IST

मुंबई - लोकल प्रवाशांना ठरावीक वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्यामुळे उपनागरातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे लोकल प्रवासी आक्रमक झाले असून सर्वसामान्य प्रवाशांची राज्य सरकारकडून चेष्टा करण्यात येत आहे. वेळेची मर्यादा घातल्याने सर्वसामान्य प्रवाशांना याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे "आम्ही फक्त रात्री लोकलमध्ये झोपायला जायचं का?" असा संतप्त सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी राज्य सरकारला केला आहे.

नंदकुमार देशमुख

वीकेंडला पूर्ण दिवस लोकल प्रवासाची मुभा द्या-

मुंबईची जीवनवाहिनी गेल्या 10 महिन्यानंतर वेळेची मर्यादा घालून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा राज्य सरकारकडून देण्यांत आली आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांनी सुट्यांच्या दिवशी किंवा वीकेंडला सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. त्यासंबंधित निवेदन सुद्धा शासनाला दिले आहे. सामान्य जनतेला लोकल प्रवासासाठी ठरवून दिलेल्या वेळा खासगी क्षेत्रातील कार्यलयीन कर्मचाऱ्यांना व अन्य लोकल प्रवाशांनाही फारसा सोईचा नाहीत. या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवार हे दोन दिवस सामान्य जनतेला पूर्णवेळ लोकल प्रवास उपलब्ध करून द्यावा, अशी नवी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाकडून करण्यात आली आहे.

राज्य सरकारविरोधात वाढतोय रोष-

लोकल प्रवास पूर्णवेळ उपलब्ध नसल्यामुळे कसारा कर्जत खोपोली व पनवेल परिसरातील नागरिक मागील 10 महिन्यांहून अधिक काळ लोकलने मुंबईला जाऊ शकले नाहीत. रुग्णालयीन उपचार, नातेवाईकांच्या भेटी अन्य काही महत्वाची कामे, खरेदी, पर्यटन अशा अनेक बाबींचा विचार केल्यास मुंबईपासून दूर असलेली लाखो जनता आजही वंचित आहे. सध्या दिलेला प्रवास वेळ अपुरा असल्याने दुरवर वास्तव्य करणारी जनता पूर्णवेळ लोकल प्रवासाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात नागरिकांमध्ये दिवसेंदिवस रोष वाढत जात आहे.

यावेळेत सर्वसामान्य लोकल प्रवासात मुभा द्या-

कोरोना निर्मूलन झाल्यशिवाय पूर्णवेळ लोकल प्रवासमुभा अशक्य असल्याची जाणीव महासंघाला आहे. मात्र शनिवार व रविवार अशी दोन दिवस सर्व सरकारी निमसरकारी आणि बहुसंख्य खासगी कार्यालये बंद असतात. हे दोन दिवस म्हणजे शुक्रवारी रात्री 9 वाजतापासून ते सोमवारी सकाळी 7.00 पर्यंत उपनगरी लोकल पूर्वीप्रमाणेच सामान्य जनतेस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे. व्यवस्थीत नियोजन केल्यास सकाळी सीएसएमटी वरुन डाऊन दिशेला आणि सायंकाळी अप दिशेला सामान्यांना लोकल प्रवासमुभा देता येईल, असेही महासंघाने राज्य शासनाला सुचवले आहे.

आम्हाला कार्यालयात पोहचण्यासाठी लेटमार्क लागणार नाही-

सर्वसामान्य प्रवाशांनी गर्दीच्या वेळी प्रवास करू नये, असे निर्देश राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. राज्य सरकारने यासाठी वेळेचे नियोजन आखले आहे. परंतु, या नियोजनामुळे कार्यालयात वेळेत पोहचणे शक्य होत नाही. अनेकवेळा लेट मार्क लागणे, हाफ डे होणे, अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शनिवारी, रविवारी आणि इतर सुट्यांच्या दिवशी पूर्ण दिवस लोकल प्रवास करण्याची मुभा दिल्यास कार्यालयात लवकर पोहचता येईल, छोट्या व्यापाऱ्यांना सामग्रीची खरेदी करता येणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

हेही वाचा- 'आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानी, देशद्रोही संबोधून त्यांचा अपमान करणे अयोग्य'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.