ETV Bharat / city

शरद पवार यांच्या मागे ईडी चौकशी कोणी लावली? नांदगावकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल - MNS leader Bal Nandgaonkar condemns ED action

शरद पवार यांना भविष्यात ईडीच्या चौकशीला बोलावणार की नाही? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे नांदगावकर म्हणाले.

बाळा नांदगावकर
author img

By

Published : Sep 27, 2019, 8:20 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागे ईडी चौकशी कोणी लावली, कोणी लावायला लावली? या सर्वांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

शरद पवारांच्या ईडी चौकशी प्रकरणी भाष्य करताना बाळा नांदगावकर

ईडीबाबत बातमी ऐकून पवार यांनी स्वतः चौकशीला सामोरे जाण्याची भावना व्यक्त केली. पवार ईडीकडे जाण्यास निघाले असता पोलिसांना त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्थेसाठी जावे लागले. पवारांना भविष्यात ईडीच्या चौकशीला बोलावणार की नाही? हे महाराष्ट्राला कळले पाहिजे. वयाने, अनुभवाने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही बोलावणार की नाही? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे नांदगावकर म्हणाले.

हेही वाचा - ईडी प्रकरण : न्यायालयाच्या आदेशानेच गुन्हे दाखल - रावसाहेब दानवे

सर्वांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुरू केला आहे. महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात अशी भावना नव्हती. हा विरोधकांना संपवण्याचा डाव आहे. पूर्वी विरोधकांनाही सन्मान दिला जायचा, असे म्हणत नांदगावकरांनी ईडीची चौकशीचे आरोप ज्यांच्यावर असतात, ते राजीनामे दिल्यावर इतर पक्षात जातात आणि त्यांना चांगले दिवस येतात, असा टोला त्यांनी पक्ष बदलणाऱ्यांना लगावला.

हेही वाचा - पवारांची पॉवर..! ईडी नरमली, म्हणाले तूर्तास चौकशीची गरज नाही

येत्या 2 दिवसात मनसेच्या उमेदवारांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेटणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे यांचे निवडणूक प्रचार दौरे जाहीर होतील. मनसे 100 पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.

Intro:मुंबई - 50 वर्षांपेक्षा जास्त काळ ज्यांनी राजकारण केलं, केंद्रात अनेक पद भूषवले अशा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागे
ईडी चौकशी कोणी लावली, कोणी लावायला लावली? या सर्वांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपक्षपणे चौकशी करावी अशी मागणी मनसेच्या वतीने मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. Body:ईडी बाबत बातमी ऐकून शरद पवार यांनी स्वतः चौकशीला सामोरे जाण्याची भावना व्यक्त केली. पवार ईडी कडे जाण्यास निघाले असता पोलिसांना त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्थेबाबत जावं लागलं. पवारांना भविष्यात ईडीच्या चौकशीला बोलावणार की नाही ?हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे.वयाने, अनुभवाने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही बोलावणार की नाही याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं असे नांदगावकर म्हणाले.
सर्वांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुरू केला आहे. महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात अशी भावना नव्हती. हा विरोधकांना संपवण्याचा डाव आहे. पूर्वी विरोधकांनाही सन्मान दिला जायचा असे नांदगावकर म्हणाले.
ईडीची चौकशीचे आरोप ज्यांच्यावर असतात, ते राजीनामे दिल्यावर इतर पक्षात जातात आणि त्यांना चांगले दिवस येतात असा टोला पक्ष बदलणार्यांना नांदगावकर यांनी लगावला.
Conclusion:येत्या 2 दिवसात मनसेच्या उमेदवारांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेटणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे यांचे निवडणूक प्रचार दौरे जाहीर होतील. मनसे 100 पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.