ETV Bharat / city

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मनसेकडून पक्षबांधणी सुरू.. पूर्वीचा सूर गवसणार का ? - राज ठाकरे

राज्यात आगामी महानगर पालिका निवडणुकीचा बिगुल काही दिवसात वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामाला लागली आहे. पुन्हा एकदा अस्तित्व निर्माण व्हावे, यासाठी जोरदार तयारी व पक्षबांधणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून होताना दिसत आहे.

MNS starts party formation
MNS starts party formation
author img

By

Published : Oct 18, 2021, 7:04 PM IST

मुंबई - राज्यात आगामी महानगर पालिका निवडणुकीचा बिगुल काही दिवसात वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामाला लागली आहे. पुन्हा एकदा अस्तित्व निर्माण व्हावे, यासाठी जोरदार तयारी व पक्षबांधणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी नाशिक आणि पुण्यामध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला होता. मात्र मुंबईमध्ये कधी मेळावा घेणार, हा प्रश्न मात्र कायम होता. मात्र आता या चर्चांवरती पूर्णविराम लागला आहे. येत्या 23 ऑक्टोंबरला भांडुप येथे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. यामुळे पुणे, नाशिक व मुंबई या तीन जिल्ह्यांवर राज ठाकरे यांचे मुख्य लक्ष असणार आहे.

राज ठाकरे यांनी आता आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. 23 ऑक्टोबर रोजी भांडुपमध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. मागील काही निवडणुकीमध्ये मनसेला राज्यात चांगले यश मिळाले नव्हते. मात्र आगामी निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी पुन्हा एकदा मनसे सक्रिय झाली आहे. यावेळी नव्या रुपात व नव्या ढंगात मनसे निवडणुकीत उतरणार आहे. नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली व औरंगाबाद या ठिकाणी मनसेकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. राज ठाकरे स्वतः या निवडणुकीमध्ये बारकाईने अभ्यास करत आहेत. पक्ष बांधणीही सुरू झाली आहे. पक्षात अनेक बदलही करण्यात आलेले आहेत. ईशान्य मुंबई हा मनसेचा बालेकिल्ला समजला जातो. या भागातून राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मुंबईतून सुरुवात करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणी, राजकीय रणनीती याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

पुन्हा एकदा ते यश मिळेल का?

2009 साली एका फटक्यात पक्षाचे 13 आमदार आणि त्यानंतर 2012 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत मुंबईत 27, पुण्यात 28 आणि नाशिकमध्ये पक्षाचा पहिला महापौर बसवण्याइतके घवघवीत यश मनसेला मिळवून दिले. मात्र 2017 उजाडेपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. मनसेला हे यश टिकवता आले नाही. 2017 मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फक्त सात नगरसेवक निवडून आले होते. मात्र या नगरसेवकांनी काही महिन्यातच पक्षाला सोडचिठ्ठी देत सहा नगरसेवकांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला होता. आता फक्त एकच नगरसेवक पक्षाकडे उरला आहे. मात्र 2012 मध्ये असलेली परिस्थिती पुन्हा निर्माण करण्यासाठी मनसे कामाला लागली आहे. यावेळी त्यांच्यासोबत सुपुत्र अमित ठाकरे देखील खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीत मनसे मुंबईत एकूण 40 वॉर्डात दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे मनसेकडून आता अधिक जोर लावला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा -राज ठाकरे डिसेंबरला अयोध्येला येणार, हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावणार - गुरु माँ कांचन गिरी

हिंदुत्वाच्या विषयावरती मागू शकतात मतदान -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर मराठी अस्मिता समोर ठेवून राज ठाकरे यांनी मतं मागितली होती. याला खूप चांगला प्रतिसाद मराठी मतदारांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या पक्षाला तरुणांनी मोठी साथ दिली होती. मराठी तरूणांच्या गळ्यातील ताईत म्हणून राज ठाकरे समोर आले. मात्र जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसतसा मराठी अस्मितेचा विषय मागे पडू लागला. आता राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विषयावरून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मंदिर उघडण्यावरून देखील मनसे आक्रमक झाली होती. तसेच भारतीय जनता पक्षाबरोबर मनसेची युती होण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी झाल्यानंतर हिंदुत्वाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मनसे अधिक प्रयत्नशील असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.