ETV Bharat / city

वाशी टोल नाक्यावरील कर्मचारी मराठीत न बोलल्यामुळे मनसे कडून चोप - मनसे सैनिक

वाशी टोल नाक्यावरील कर्मचारी मराठीत न बोलल्यामुळे आणि अरेरावी भाषा केल्यामुळे मनसे सैनिकांनी त्याला मारहाण केली.

author img

By

Published : Feb 7, 2021, 9:26 PM IST

मुंबई - वाशी टोल नाक्यावरील कर्मचारी मराठीत न बोलल्यामुळे आणि अरेरावी भाषा केल्यामुळे मनसे सैनिकांनी त्याला मारहाण केली. मराठी मुद्द्यावर मनसे पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे. वाशी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना माफी मागायला सांगितली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मराठी भाषेवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक-

आज वाशी टोल नाक्यावर मनसेचे काही कार्यकर्ते प्रवास करत होते. दरम्यान मराठीत न बोलल्यामुळे व अरेरावी केल्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांकडून चोप देण्यात आला. कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी कोर्टात बोलवण्यात आले होते. आज पुन्हा एकदा वाशी टोल नाक्यावर मराठी भाषेवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत.

वाशी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला मनसेकडून चोप मिळाल्यानंतर त्याने जाहीर माफी मागितली आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा- कृषी कायद्यांबाबत राज्य सरकारची दुटप्पी भूमिका - प्रकाश आंबेडकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.