ETV Bharat / city

Raj Thackeray : अनधिकृत मदरशांबाबत काय आहे मनसेचा प्लॅन ? मनसे उतरणार रस्त्यावर - राज ठाकरे

राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत काही राज्यातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण करण्याची मागणी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारकडे केली होती. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अवैध मदरसे सुरू असल्याचा आरोप मनसेने केला (Raj Thackeray against unauthorized Madrasa) होता.

Raj Thackeray
राज ठाकरे
author img

By

Published : Oct 6, 2022, 4:01 PM IST

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने गाजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांनी देखील आपण हिंदुत्वासाठी हे बंडखोरी केल्याचं म्हटलेलं आहे. आता राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत काही राज्यातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण करण्याची मागणी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारकडे केली होती. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अवैध मदरसे सुरू असल्याचा आरोप मनसेने केला होता. त्यामुळे या अनधिकृत मदरशांबाबत काय आहे मनसेचा प्लॅन? या मदरशांविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार का? याचा ईटीव्हीने आढावा घेतलेला (Raj Thackeray against unauthorized Madrasa) आहे.

मदरशांमध्ये देशविघातक कारवाया ? यासंदर्भात माहिती देताना मनसेचे प्रवक्ते योगेश चिले म्हणाले की, आपल्या राज्यात अनेक ठिकाणी अनधिकृत मदरसे सुरू असून, हिंदू बहुल भागातील इमारतींमध्ये अशा अनधिकृत मदरशांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे अनधिकृत मदरसे सुरू असलेल्या हिंदू रहिवासी भागाला मुस्लिम भाग बनवण्याचं हे एक मोठं षडयंत्र आहे. आपला महाराष्ट्र वगळता देशात अनेक ठिकाणी अशा अनधिकृत मदरशांचे सर्वेक्षण झालं असून त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम या राज्यांनी अनधिकृत मदरशांचे सर्वेक्षण केलं असून काही मदरशांवर तात्काळ कारवाई देखील केली आहे. इथे त्यांना देशविघातक कृत्य दहशतवादी कारवाया कट रचले जात असल्याचं तपास यंत्रणांच्या निदर्शनास आलं आहे.

मदरशांची आकडेवारी नाही - हाऊसिंग सोसायट्यांपासून ते शॉपिंग कॉम्प्लेक्सपर्यंत हे मदरसे सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या निधीचा स्रोत शोधला पाहिजे, असे मनसेचे म्हणणे आहे. त्यांच्यामध्ये देशविरोधी कारवाया होत आहेत का? याची चौकशी सरकारने करणं गरजेचं आहे असे चिली यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र पोलीस आणि धर्मादाय आयुक्तांकडे मदरशांची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही, असा आरोप चिले यांनी केला आहे. मदरशांच्या सर्वेक्षणाच्या मागणीसाठी मनसेचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. अशी माहिती योगेश चिले यांनी दिली (unauthorized Madrasa) आहे.

तर मनसे रस्त्यावर उतरेल - सरकारने बेकायदा मदरशांवर कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या शैलीत कारवाई सुरू करेल, असा इशारा मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी अवैध मदरशांचा मुद्दा उपस्थित केला. आज शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या नव्हे तर शरद पवारांच्या भाषेत बोलू लागली असून त्यांच्या विचारांवर चालत आहे. अशी टीका चिले यांनी केली आहे.

दरम्यान, एका बाजूला पीएफआयएममुळे देशभरातील सामाजिक वातावरण ढवळून निघालेला असताना त्यात आता मनसेने मदरशांचा नवीन मुद्दा उपस्थित केल्याने याला सरकार कसा पाठिंबा देत, खरंच सरकार या मदरशांच्या चौकशीचे आदेश देणार का ? दिले तर या चौकशीतून नेमकं काय समोर येईल ? हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.