मुंबई - गुढीपाडाव्या निमित्त दादर शिवाजी पार्क येथून मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा, अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज घाटकोपरमध्ये मनसेच्या महेंद्र भानुशाली ( Ghatkopar MNS Leader Mahendra Bhanushali ) यांनी चांदिवली येथील कार्यालयावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा ( Hanuman Chalisa on Loudspeaker ) सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी भानुशाली यांना ताब्यात घेऊन दंड आकारून सोडून दिले आहे.
पोलिसांनी केले स्पीकर जप्त - राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर चांदीवली येथे मनसेच्या कार्यालयावर शाखा अध्यक्ष महेंद्र भानुशाली स्पीकर लाऊन हनुमान चालीसा लावली. यापुढे रोज आपण हनुमान चालीसा लावणार असल्याचे भानुशाली यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे मुस्लीमांचा रमजान हा सण सुरू झालेला असतानाच मनसेने हनुमान चालिसा सुरू केल्याने धार्मिक वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. या दरम्यान पोलिसांनी महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेतले आहे. तसेच स्पीकर व इतर साहित्य घाटकोपरच्या चिराग नगर पोलिसांनी जप्त केले आहे. भानुशाली यांना पोलिसांनी साडेपाच हजार रुपये दंड आकारून सोडून दिले आहे. आपल्याला पुन्हा स्पीकर मिळाल्यास रोज हनुमान चालीसा, गणपतीची आरती आदी धार्मिक गाणी वाजवू असे भानुशाली यांनी म्हटले आहे.
-
MNS plays Hanuman Chalisa at high volume from loudspeakers at its Mumbai office, leader detained
— ANI Digital (@ani_digital) April 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/tIfY19GH6m#HanumanChalisa #RajThackeray #MNS pic.twitter.com/U9lJAyuEZJ
">MNS plays Hanuman Chalisa at high volume from loudspeakers at its Mumbai office, leader detained
— ANI Digital (@ani_digital) April 3, 2022
Read @ANI Story | https://t.co/tIfY19GH6m#HanumanChalisa #RajThackeray #MNS pic.twitter.com/U9lJAyuEZJMNS plays Hanuman Chalisa at high volume from loudspeakers at its Mumbai office, leader detained
— ANI Digital (@ani_digital) April 3, 2022
Read @ANI Story | https://t.co/tIfY19GH6m#HanumanChalisa #RajThackeray #MNS pic.twitter.com/U9lJAyuEZJ
'राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया नको' - दुसरीकडे राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असे एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केले आहे, त्यावरून आता समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यावर सध्या तरी कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असे ओवैसी यांनी सांगितलेले आहे, असेही खासदार जलील म्हणाले.
हेही वाचा - Kishori Pednekar : बाळासाहेबांच्या सानिध्यात खूप लोक घडले, मग हे का बिघडले;पेडणेकरांची टीका