ETV Bharat / city

MNS Shivjayanti : मनसेच्या शिवजयंतीत दिसलं हिंदू मुस्लिम ऐक्य, ढोल वाजवणारा सलमान चर्चेत

याच ढोल-ताशा पथकातील सदस्य असलेला सलमान हा संपूर्ण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. एकीकडे देशात हिंदू मुस्लिम द्वेषाचं राजकारण वाढत असताना सलमानने या जयंती सोहळ्यात केलेलं वादन सध्या चर्चेत आहे.

MNS Shivjayanti
MNS Shivjayanti
author img

By

Published : Mar 21, 2022, 8:06 PM IST

मुंबई : तिथीनुसार शिवजयंती निमित्त मनसेकडून मोठ्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात तालमंत्र या ढोल ताशा पथकाने देखील सहभाग घेतला होता. आणि याच ढोल-ताशा पथकातील सदस्य असलेला सलमान हा संपूर्ण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. एकीकडे देशात हिंदू मुस्लिम द्वेषाचं राजकारण वाढत असताना सलमानने या जयंती सोहळ्यात केलेलं वादन सध्या चर्चेत आहे.

शिवजयंती महोत्सव

विविध क्षेत्रातील तरुणांचा तालमंत्र
या ढोल पथकात जवळपास शंभर तरुण तरुणींचा सहभाग आहे. हे सर्वजण विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यातील काही जणांचा व्यवसाय आहे, काही जण खाजगी कंपनीमध्ये कामाला आहेत, तर काहीजण शिक्षक सुद्धा आहेत. हे सर्वजण एकत्र येत मागील सहा ते सात वर्षापासून ढोल वादन करत आहेत.

'जातीय आणि धार्मिक द्वेष कमी करा' राज ठाकरे
"आज महाराजांच्या जयंती निमित्त मी शपथ घेतो की स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी स्वराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्याला अनुसरून महाराष्ट्रात सुराज्याच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. जाती-जातीत विभागला गेलेला समाज एक रहावा यासाठी प्रयत्न करू. महिलांचा आत्मसन्मान व नागरिकांच्या सुदृढ आरोग्य यासाठी सदैव काम करू," अशी शपथ राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

हेही वाचा - Shiv Jayanti Special Rangoli : शिवजयंतीनिमित्त प्रतिबिंब रांगोळी काढून कलाकार अवलियाने वाहिली महाराजांना आदरांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.