ETV Bharat / city

Sandeep Deshpande : 'बाबा आपण त्यांना GPS ट्रॅकरच बांधूया'; संदीप देशपांडे यांनी व्यंगचित्रातून उडवली शिवसेनेची खिल्ली - ASSEMBLY SESSION 2022

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या या निर्णयाची आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी एक मीम शेअर करत खिल्ली उडवली आहे.यात आदित्य ठाकरे( Aditya Thackeray)हे उद्धव ठाकरे यांना सांगत आहेत 'बाबा आपण शिवबंधन आणि प्रमाणपत्र मागण्यापेक्षा त्यांना जीपीएसच लावू.' संदीप देशपांडे यांचे हे मीम सध्या प्रचंड व्हायरल असून, सोशल मीडियात या मीमची चर्चा आहे.

Maharashtra politics
संदीप देशपांडे
author img

By

Published : Jul 4, 2022, 5:55 PM IST

मुंबई - शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेचे 39 आमदार फोडत उद्धव ठाकरेंसोबत बंडखोरी केली. त्यानंतर शिंदे गटाने भाजप सोबत हात मिळवणी करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज या शिंदे फडणवीस सरकारची बहुमत चाचणी पार पडली. या सर्व घडामोडी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी आता शिवसैनिकांना शिवबंधन नंतर एक प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाची आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक मीम शेअर करत खिल्ली उडवली आहे.

Sandeep Deshpande
संदीप देशपांडे यांचे ट्वीट

सोशल मीडियावर व्हायरल - शिवसेनेचे आमदार एक-एक करून बंडखोरी करायला लागल्यावर उद्धव ठाकरे यांनी एक निर्णय घेतला आणि सर्व शिवसैनिकांना एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र देण्यास सांगितले. यावरून संदीप देशपांडे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल ( Social media handle ) वरती एक मीम शेअर केले. यात त्यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

नेमके काय आहे मीम ? संदीप देशपांडे यांनी शेअर केलेल्या या मीम मध्ये उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे चर्चा करताना दिसत आहेत. या दोघांच्या मागे एक टीव्ही आहे. आणि त्या टीव्हीवर बातमी दिसतेय एकनाथ शिंदे यांच्या दाव्याची खरी शिवसेना आमचीच. यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे चर्चा करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसैनिकांनी दिलेलं प्रतिज्ञापत्र दिसतंय तर त्याचवेळी आदित्य ठाकरे तिथे येऊन उद्धव ठाकरे यांना सल्ला देतायेत. 'बाबा एक आयडिया सुचलेय आपण शिवसैनिकांना शिवबंधन व प्रतिज्ञापत्र ऐवजी त्यांच्या हातात जीपीएस ट्रैकरच लावू.' असा सल्ला आदित्य ठाकरे देत आहेत.

शिवसैनिकांचं प्रमाणपत्र - एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीसहून अधिक आमदार, आठ मंत्री फुटल्याने पक्ष वाचवण्याचा सर्वात मोठा प्रश्न पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. शिवसेनेत आणखी फूट पडू नये आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी सोडून जाऊ नयेत म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश दिले. यात या सर्व पदाधिकाऱ्यांना 'माझा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे' हे लिखित स्वरूपात द्यावं लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाची सध्या सर्वच स्तरांतुन खिल्ली उडवली जात आहे. त्यापैकीच हे एक संदीप देशपांडे.

हेही वाचा - Shiv Sena Workers Loyalty Certificate : शिवसेना आपल्या पदाधिकाऱ्यांकडून घेणार एकनिष्ठेची प्रमाणपत्र
हेही वाचा- Devendra Fadnavis statement : बदल्याच्या भावनेने काम करणार नाही , देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.