ETV Bharat / city

'मेट्रो कारशेडचे पैसे मातोश्रीवरून नाही, तर सर्वसामान्याच्या खिशातून जाताहेत' - sandeep deshpand news

लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा अशी आंदोलने सुरूच राहतील. प्रकल्पाची किंमत वाढत आहेत. हे पैसे मातोश्रीच्या खिशातून नाही, तर सर्वसमान्य जनतेच्या खिशातून जात आहेत, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

mns
mns
author img

By

Published : Jan 14, 2021, 3:11 PM IST

मुंबई - मेट्रो कारशेडचे काम थांबले आहे. मात्र सरकार यातून काही मार्ग काढताना दिसत नसल्याने प्रकल्पाला विलंब होत आहे. या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वरळी येथे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने आपला अहंकार आणि हट्ट सोडावा आणि सामान्य मुंबईकरांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा अशी आंदोलने सुरूच राहतील. प्रकल्पाची किंमत वाढत आहेत. हे पैसे मातोश्रीच्या खिशातून नाही, तर सर्वसमान्य जनतेच्या खिशातून जात आहेत, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

'बालहट्टामुळे विलंब'

मुंबईतील महत्त्वपूर्ण मेट्रो प्रकल्पाला उशीर होत आहे. अनेक मेट्रोच कारशेड कुठे करायचे याबाबत राज्य सरकार संभ्रमात आहे. सरकारने लवकरात लवकर मार्ग काढावा आणि कारशेडचे काम सुरू करावे यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. मेट्रोच्या कामाला होणारा विलंब हा केवळ बालहट्टामुळे होत आहे. प्रकल्पाला होणार विलंब यामुळे सामान्य जनतेचे पैसे जात आहेत. त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.

'दरदिवशी 4 कोटींची भर'

मेट्रो कारशेड पूर्वी आरेला होणार होते. मात्र लोकांचा विरोध असल्यामुळे हे कारशेड कांजूरमार्गला करण्याचे ठरविण्यात आले. मात्र राज्य सरकारचा अभ्यास कमी पडल्यामुळे हे सरकार न्यायालयात तोंडावर पडले. आरेची जागा बदलली याबाबत आम्ही सरकारच्या भूमिकेचे स्वागत केले. मात्र जेव्हा दुसरी जागा निवडली त्याचा अभ्यास सरकारकडून करण्यात आला नाही. कोर्टामध्ये सरकारने बाजू मांडली नाही. यामुळे दिवसेंदिवस या प्रकल्पाची किंमत वाढत आहे. ही किंमत आजच्या घडीला सतराशे १७५१ कोटी झाली आहे. दरदिवशी 4 कोटी वाढत आहेत. जरा प्रकल्प वेळेवर नाही झाला तर साडेतीन हजार ते चार हजार कोटीचा बोजा हा सर्वसामान्यांवर पडणार आहे. त्यामुळे कारशेड कुठेही करा मात्र ते लवकरच करा नाही, तर मनसेचे हे आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.