ETV Bharat / city

मनसे, भाजप मनपा निवडणुकीत एकत्र लढणार? सरदेसाई म्हणतात... - mns latest news

शिवसेनेपासून दुरावलेला भाजप आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नव्या भिडूच्या शोधात आहे. यामुळे भाजप आणि मनसे पालिका निवडणुकीत एकत्र येतील अशी चर्चा जोरदार सुरू आहे.

mns leader nitin sardesai
मनसेचे नेते नितीन सरदेसाई
author img

By

Published : Dec 7, 2020, 6:38 PM IST

मुंबई - शिवसेनेपासून दुरावलेला भाजप आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नव्या भिडूच्या शोधात आहे. यामुळे भाजप आणि मनसे पालिका निवडणुकीत एकत्र येतील अशी चर्चा जोरदार सुरू आहे. मात्र, मनसेने अजूनही आपले पत्ते उघडले नसले तरी भाजपसोबत मराठी अस्मिता आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, असे संकेत मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दुखावलेल्या भाजपने आता मुंबई महानगरपालिकेकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत आपले राजकारण यावर आधारीत असणार आहे, असे सांगितले आहे. यामुळे भाजप आणि मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.

याबाबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांना विचारले असता त्यांनी देखील मनसेच्या मराठीपणाचा व्यापक अर्थ कोणाच्या लक्षात आला नसेल, तर यावर नक्कीच चर्चा केली जाऊ शकते. तसेच अमराठी नागरिकांना मारहाण किंवा तत्सम प्रकाराबाबत मनसेचं नाव घेतलं जात असेल तर हा मुद्दाही चुकीचा आहे. या मुद्द्यावरही चर्चा करण्यास मनसे तयार आहे. मात्र, कोणताही राजकीय निर्णय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे घेतील, असे नितीन सरदेसाई यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - रुग्णांना बोगस लॅबमध्ये पाठवणाऱ्या डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या; देशात पहिल्यांदाच डॉक्टरचे निलंबन

हेही वाचा - नरभक्षक बिबट्याचा तिसरा बळी; ऊसतोड कामगाराची मुलगी भक्ष्यस्थानी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.