ETV Bharat / city

राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर कडक निर्बंध लावा, मनसेची मागणी - MNS leader Bala Nandgaokar

राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारले जात आहेत. त्याठिकाणील येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकता. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे. असे ट्विट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

मनसे नेत बाळा नांदगावकर
मनसे नेत बाळा नांदगावकर
author img

By

Published : Apr 9, 2021, 4:40 PM IST

मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे परिस्थिती वाढू नये यासाठी राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावावे अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारले जात आहे. तिथून येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकता. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे.असे ट्विट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन साठ्यावरून साधला निशाणा

व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची कमतरता आहे. सरकार आता त्यासाठी प्रयत्न करत आहे. हे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचे काम आहे. मधील काळात जर 1000 नविन व्हेंटिलेटर आणले असते तर असा बोजवारा उडाला नसता. मनसेच्या एका कार्यकर्त्याने पदर मोड करून मागील वर्षी 2 व्हेंटिलेटर हॉस्पिटलला दिले. जी तत्परता मंत्र्याचे बंगले नूतनीकरण व वाहन खरेदीसाठी दाखवता तीच तत्परता आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी दाखवल्यास जनतेचे भले होईल, असे खोचक ट्विट नांदगावकर यांनी केले आहे.

पुण्यात व्हेंटिलेटरची कमतरता

पुण्यात सध्याच्या घडीला रुग्णाला व्हेंटिलेटवर ठेवायचे झाल्यास एकही बेड शिल्लक नाही. तर कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ऑक्सिजन बेडसची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण पुणे जिल्ह्यात केवळ 376 ऑक्सिजन बेडस उरले आहेत. व्हेंटिलेटर्स बेडससाठी रुग्ण अक्षरश: वेटिंग लिस्टमध्ये आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.