ETV Bharat / city

BMC Election : हिंदुहृदयसम्राट राज ठाकरे, मनसेच्या बॅनरमुळे वाद होण्याची शक्यता - हिंदुहृदयसम्राट

आज मुंबई उपनगरातील कामराज नगर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांचे पुत्र अमित ठाकरे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या भेटी घेणार आहेत. पक्षाध्यक्षांच्या स्वागतासाठी घाटकोपरमध्ये कार्यकर्त्यांनी स्वागताचे बॅनर लावले पण त्यावर राज ठाकरे यांचा 'हिंदुहृदयसम्राट', असा उल्लेख केला आहे. यामुळे सेना व मनसे यांच्यात वाद उफाळण्याची शक्यता आहे.

बॅनर
बॅनर
author img

By

Published : Feb 14, 2022, 4:14 PM IST

मुंबई - बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका ( BMC Election ) आता तोंडावर आले आहेत. बदललेल्या प्रभाग रचनेमुळे सध्या अनेक स्थानिक नेते पालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आज मुंबई उपनगरातील कामराज नगर येथे मनसे ( MNS ) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) व त्यांचे पुत्र अमित ठाकरे ( Amit Thackeray ) कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या भेटी घेणार आहेत. पक्षाध्यक्षांच्या स्वागतासाठी घाटकोपरमध्ये कार्यकर्त्यांनी स्वागताचे बॅनर लावले पण त्यावर राज ठाकरे यांचा 'हिंदुहृदयसम्राट', असा उल्लेख केला आहे. यामुळे सेना व मनसे यांच्यात वाद उफाळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह - मनसेचे घाटकोपर पश्चिमचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी हे बॅनर लावले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवून विजयी पताका मिळवणारी शिवसेना महाविकास आघाडीत शामिल झाल्यानंतर सेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

याबाबत बोलताना मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल म्हणाले, "बाळासाहेबांचे खरे वारसदार हे राज ठाकरेच आहेत. याचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्राने वेळोवेळी घेतला आहे. राज्यात कोणीही हिंदुंच्या विरोधात भूमिका घेतल्यातेव्हा राज ठाकरेच हिंदुंच्या मागे ठामपणे उभे होते व आहेत.

मनसेला फयदा होणार का..? - यापूर्वी राज ठाकरे यांना मनसेकडून 'मराठी हृदयसम्राट', अशी उपाधी दिली जात होती. मात्र, ती बदलून आता 'हिंदुहृदयसम्राट' ही उपाधी दिल्याने याचा मनसेला निवडणुकीत फायदा होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - Mumbai Congress Protest : काँग्रेस-भाजपच्या आंदोलनाचा सर्वसामान्यांना फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.