ETV Bharat / city

महापौर किशोरी पेडणेकरांनी त्वरित राजीनामा द्यावा - मनसे - साईप्रसाद पेडणेकरांवर मनसेचा आरोप

ज्यांना वैद्यकीय कामाचा अनुभव नाही, ई-टेंडरमध्ये त्यांची पडताळणी नाही, अशा 'किश कॉर्पोरेट सर्व्हिस इंडिया' कंपनीला या सेंटरच कंत्राट मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच सदर कंपनीमध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांचे पुत्र साईप्रसाद पेडणेकर संचालक असून त्यांच्यासह शैला वसंत गवस आणि प्रशांत महेश गवस हे या कंपनीचे संचालक असल्याचे त्यांनी सांगितले.

मनसे
मनसे
author img

By

Published : Aug 20, 2020, 5:09 PM IST

Updated : Aug 20, 2020, 5:21 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिका, महापौर आणि कोविड काळात महापालिकेच्या आर्थिक कारभारावर जोरदार टीका केली. या पत्रकार परिषदेत मनसे नेते नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे सुद्धा उपस्थित होते.

मनसेची पत्रकार परिषद

पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यापासून मुंबईच्या महापौरांपर्यंत महापालिका कारभारा बद्दल आरोप केले आहेत. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात राजकारण करू नका, सहकार्य करा', पण पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचर होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. बीकेसी सेंटरमध्ये बनवण्यात आलेल्या क्वावेंटाइन सेंटरचे कंत्राट 'इव्हेंट कंपनी'ला दिल्याचा आरोपही त्यांनी केला. ज्यांना वैद्यकीय कामाचा अनुभव नाही, ई-टेंडरमध्ये त्यांची पडताळणी नाही, अशा 'किश कॉर्पोरेट सर्व्हिस इंडिया' कंपनीला या सेंटरच कंत्राट मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच सदर कंपनीमध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांचे पुत्र साईप्रसाद पेडणेकर संचालक असून त्यांच्यासह शैला वसंत गवस आणि प्रशांत महेश गवस हे या कंपनीचे संचालक असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या उर्जामंत्र्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात

गोरेगावच्या जम्बो सेंटरमध्ये याच कंपनीला काम देण्यात आले आहे, असा आरोप मनसे नेत्यांनी केला. यासंदर्भात जाब विचारावा अशी मागणी त्यांनी विरोधी पक्षाला देखील केली आहे. प्रकरणात लोकांचा पैसा स्वतःसाठी वापरला असून याची मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार करणार असल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली. पण महापौरांच्या मुलाला कोणत्याही निकषांशिवाय कंत्राट मिळाल्याने महापौरांनी त्वरित राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यासोबतच या संदर्भात विधानसभा अधिवेशनात आमदार राजू पाटील हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - स्वच्छता सर्वेक्षण - 2020 : देशात इंदूर सर्वांत स्वच्छ शहर; तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

Last Updated : Aug 20, 2020, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.