ETV Bharat / city

ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा मनसेचा निर्णय

विधानपरिषद निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. ग्रामीण भागात आपला संपर्क वाढवण्यासाठी या निवडणुकीत मनसे आता आपले नशीब आजमवणार आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

Gram Panchayat elections news
ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा मनसेचा निर्णय
author img

By

Published : Dec 14, 2020, 10:33 PM IST

मुंबई- विधानपरिषद निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. ग्रामीण भागात आपला संपर्क वाढवण्यासाठी या निवडणुकीत मनसे आता आपले नशीब आजमवणार आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांना बाळा नांदगावकर यांचे पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुचित करण्यात येतं की, आपण आपल्या ग्रामपंचायतींमध्ये मनसेचे उमेदवार उभे करावेत आणि त्यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणावं, अशा आशयाचे पत्र मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांना लिहले आहे. दरम्यान मनसेच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये चुरस पाहायला मिळू शकते, पुन्हा एकदा या निमित्ताने मनसे आणि शिवसेना आमनेसामने येणार आहेत. मनसेच्या या निर्णयाचा शिवसेनेला फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे. या निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 18 जानेवारीला मतमोजणी होईल.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.