ETV Bharat / city

एमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? मनसेची इम्तियाज जलील यांच्यावर टीका - औरंगाबाद जल्लोष

औरंगाबादमधील लॉकडाऊन रद्द झाल्यानंतर लॉकडाऊनला विरोध करणारे इम्तियाज जलील यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी करून एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे.

MNS Criticis Imtiaz Jalil
MNS Criticis Imtiaz Jalil
author img

By

Published : Mar 31, 2021, 3:17 PM IST

मुंबई - औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र काही वेळातच हा निर्णय रद्द करण्यात आला होता. या निर्णयानंतर या लॉकडाऊनला विरोध करणारे इम्तियाज जलील यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी करून एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे.

असे 'व्हायरस' वेळीच ठेचायला हवेत -

एमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमध्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढतेय, परिस्थिती गंभीर आहे असं असताना असा जल्लोष करताना, नाचताना शरम वाटायला पाहिजे. हा तर प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे 'व्हायरस' वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत केली आहे.

MNS Criticis Imtiaz Jalil
अमेय खोपकर यांनी केलेले ट्विट
हे ही वाचा - शरद पवार, अमित शाह गुप्त भेटीमागचे रहस्य शिवसेनेने उलगडले, भाजपला मात्र गुप्त आजार
लॉकडाऊन स्थगित -कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात 31 मार्च ते 9 एप्रिल या काळात सक्तीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. प्रशासनाने जाहीर केलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनला शहरातील विविध पक्ष, संघटनांनी कडाडून विरोध केला होता. तसेच लॉकडाऊनच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी दुपारी 'जनआक्रोश मोर्चा'चे आयोजन केले होते. सक्तीच्या लॉकडाऊनचा सर्व स्तरातून होत असलेला विरोध पाहता जिल्हा प्रशासनाने, राज्य शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाऊन स्थगित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.