ETV Bharat / city

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक.. वाशी ते विधान भवन मोर्चा, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात - स्वप्नील लोणकर आत्महत्या

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. आज मनसेतर्फे देखील वाशी ते विधानभवनाच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला होता.

MNS aggressive after mpsc student Swapnil Lonakar's suicide

author img

By

Published : Jul 5, 2021, 3:20 PM IST

मुंबई - एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. आज मनसेतर्फे देखील वाशी ते विधानभवनाच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला होता. पायी निघालेल्या या मोर्चामध्ये मनसेचे 150 ते 200 कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवत आंदोलकांना ताब्यात घेतले.

मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई ते वाशी असा मोर्चा काढला. सकाळी ७ वाजता वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास सुरुवात झाली. परंतु वाशी पोलिसांनी रस्त्यातच मोर्चा अडवला. स्वप्निलला न्याय मिळालाच पाहिजे, सरकारवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे, या सरकारच करायचं काय, खाली डोकं वरती पाय, अशा घोषणा देऊन महाराष्ट्र सैनिकांनी वाशी परिसर दणाणून सोडला. सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वाशी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत हे आंदोलन थांबवले.

मनसेचा वाशी ते विधान भवन मोर्चा
मनसेचा वाशी ते विधान भवन मोर्चा
काय आहे संपूर्ण प्रकरण -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केली. पुण्यात त्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने एक पत्र लिहिले होते. ज्यात परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्याने होत असलेल्या वेदनांना वाट मोकळी करुन दिली. इतकं टोकाचं पाऊल का टाकावे लागलं याची व्यथा मांडत स्वप्नीलने गळ्याला फास लावून घेतला. अखेरच्या काही तासांत त्याच्या मनात काय सुरू होतं याची उत्तरं त्याने पत्रातून दिली आहेत.

MNS aggressive after mpsc student Swapnil Lonakar's suicide
पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात
मनसेचा आक्रमक पवित्रा -
एमपीएससी मार्फत परीक्षा घेतल्या जातात, त्यामध्ये सदस्यांचे पुरेसे संख्याबळ नाही. सध्या केवळ दोन सदस्य याचं काम पाहत आहेत. हे खूपच दुर्दैवी आहे. त्यामुळे सरकारचा निषेध करत आम्ही आता विधानभवनाच्या दिशेने निघालो आहोत. आज हजारो एमपीएससी उत्तीर्ण मुलं नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये असे अनेक जण आहेत ज्यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पास करुन मुलाखती देखील दिल्या आहेत. मात्र त्यांना अजूनही नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. याबाबत कोणत्याही प्रकारची दखल सरकार घेणार नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय नाही, असे मनसे नेते गजानन काळे यांनी सांगितले.
स्वप्निलच्या त्यानंतर राज्य सरकारला जाग -
स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्या नंतर राज्य सरकारला जाग आली आहे. विधानसभेत या विषयावरून जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलै 2021 पर्यंतच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.