मुंबई - आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस मंगळवारी रात्री ताज हॉटेलबाहेर उभ्या होत्या. त्या बस मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्या आहेत.
-
Mumbai | An FIR has been registered against 5-6 unknown persons under sections 143,147,149,427 of IPC for allegedly attacking the Delhi Capital IPL team parked bus, police said pic.twitter.com/aED8Z1Hd5G
— ANI (@ANI) March 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai | An FIR has been registered against 5-6 unknown persons under sections 143,147,149,427 of IPC for allegedly attacking the Delhi Capital IPL team parked bus, police said pic.twitter.com/aED8Z1Hd5G
— ANI (@ANI) March 16, 2022Mumbai | An FIR has been registered against 5-6 unknown persons under sections 143,147,149,427 of IPC for allegedly attacking the Delhi Capital IPL team parked bus, police said pic.twitter.com/aED8Z1Hd5G
— ANI (@ANI) March 16, 2022
आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करून काही झाले नाही
महाराष्ट्रात होणारे आयपीएलच्या सामन्यातील वाहतूक व्यवसाय हा महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून बाहेरच्यांच्या घशात घालायचा प्रयत्न सुरू होता. (MNS activists On IPL) आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करून काहीही होत नव्हते. त्यामुळे मनसेने हा दणका दिला आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली आहे.
नेमकं कारण काय?
आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून ही तोडफोड करण्यात आली. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या प्रवासासाठी महाराष्ट्राच्या बाहेरुन आणल्या आहेत. राज्यातील बसेस वाहतूकदारांना हे काम दिले जात नसल्यानेच मनेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज
स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम दिले जावे अशी मनसेची मागणी आहे. आयपीएलच्या हंगामाला 26 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - सोनिया गांधी कडाडल्या, मागितला उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूरच्या काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा