ETV Bharat / city

मुंबईत महापौर बंगल्यावर मनसे कार्यकत्यांची धडक - Mumbai Mayor Video Goes Viral

मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सांताक्रूझ येथे एका महिलेचा हात पिरगळत धमकी दिल्याप्रकरणी सर्व स्तरावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. गुरुवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी भायखळा राणीबाग येथील महापौर बंगल्यावर धडक दिली. यावेळी महापौरांनी भेट नाकारल्याने मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला.

मुंबईत महापौर बंगल्यावर मनसे कार्यकत्यांची धडक
author img

By

Published : Aug 9, 2019, 9:48 AM IST

Updated : Aug 9, 2019, 10:16 AM IST

मुंबई - मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनी सांताक्रूझ येथे एका महिलेचा हात पकडून पिरगळत धमकी दिली. याबाबत राजकीय वर्तुळात संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, याविरोधात गुरुवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी भायखळा राणीबाग येथील महापौर बंगल्यावर धडक देत महापौरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसेच यावेळी त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौरांनी भेट नाकारल्याने मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला.

मुंबईत महापौर बंगल्यावर मनसे कार्यकत्यांची धडक

सांताक्रूझ वाकोला येथे माला नगम व संकेत नगम या माय-लेकाचा शॉक लागून मृत्यू झाला. विभागात पाणी साचून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको केला. या मृतांच्या घरी महापौर विश्वनाथ महाडेश्वर गेले असता त्यांना स्थानिक नागरिक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. महापौरांना मृतांच्या घरी जाण्यापासून रोखले. या विभागात पाणी साचले होते. त्यातच एकाच घरातील दोघांचा शॉक लागून मृत्यू झाला, असा आरोप येथील रहिवाशांचा आहे. विभागात पाणी साचले त्यावेळी महापौर कुठे होते ? असा जाब महिला विचारत असताना महापौरांनी एका महिलेचा हात पिरगळत, मला ओळखत नाहीस का, असे शब्द प्रयोग करत धमकी दिली. यामुळे महापौरांवर सर्वच स्तरावरुन टीका होत आहे.

याप्रकरणी महापौरांवर कारवाई करण्यात यावी, गुन्हा नोंद करावा म्हणून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील पोलीस ठाण्यात निवेदन दिले. तर त्याचवेळी मनसेचे काही कार्यकर्ते भायखळा राणीबाग येथील महापौर बंगल्यावर गेले. त्याठिकाणी त्यांनी महापौरांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौरांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापौरांविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोदवला. दरम्यान, मनसेचे कार्यकर्ते व विशेष करून महिला कार्यकर्त्या महापौर बंगल्याबाहेर जमल्याने त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तर महापौरांनी भायखळा व बाजूच्या विभागातील कार्यकर्ते व नगरसेवकांना आपल्या बचावासाठी बंगल्यावर बोलावून घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

सांताक्रूझ वाकोला येथे माला नगम व संकेत नगम या दोघांचा शॉक लागून मृत्यू झाला. विभागात पाणी साचून विजेच्या धक्क्याने या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 'रास्ता रोको' केला. मृतांच्या घरी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे स्थानिक आमदार तृप्ती सावंत, स्थानिक नगरसेविका प्रज्ञा भूतकर यांच्यासह भेट देण्यास गेले. परंतु, यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना अडवले. त्यामुळे नागरिक आणि महापौरांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी संतप्त झालेल्या महापौरांनी एका महिलेचा हात पिरगळून, तू मला ओळखत नाहीस का ? असे शब्द वापरून धमकी दिली. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Intro:मुंबई - मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनी सांताक्रूझ येथे एका महिलेचा हात पकडून पिरगळत धमकी दिली आहे. याबाबत राजकीय वर्तुळात संतापात प्रतिक्रिया उमटत आहेत. आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत भायखळा राणीबाग येथील महापौर बंगल्यावर धडक देत महापौरांचा निषेध केला. तसेच त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र महापौरांनी भेट नाकारल्याने या मनसे कार्यकर्त्यांनी महापौरांचा निषेध केला.Body:सांताक्रूझ वाकोला येथे माला नगम व संकेत नगम या माय लेकाचा शॉक लागून मृत्यू झाला. विभागात पाणी साचून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको केला. या मृतांच्या घरी महापौर विश्वनाथ महाडेश्वर गेले असता त्यांना स्थानिक नागरिक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. महापौरांना मृतांच्या घरी जाण्यापासून रोखले. या विभागात पाणी साचले होते. त्यातच एकाच घरातील दोघांचा शॉक लागून मृत्यू झाला असा आरोप येथील रहिवाशांचा आहे. विभागात पाणी साचले त्यावेळी महापौर कुठे होते असा जाब महिला विचारत असताना महापौरांनी एका महिलेचा हात पिरगळत मला ओळखत नाहीस का असे शब्द प्रयोग करत धमकी दिली. यामुळे महापौरांवर सर्वच थरातून टिका होत आहे.

या प्रकरणी महापौरांवर कारवाई करावी, गुन्हा नोंद करावा म्हणून आज मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील पोलीस ठाण्यात निवेदन दिले. तर त्याच वेळी मनसेचे काही कार्यकर्ते भायखळा राणीबाग येथील महापौर बंगल्यावर गेले. त्याठिकाणी त्यांनी महापौरांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र महापौरांनी मनसे कार्यकर्त्यांना भेटण्यास नकार दिला. यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापौरांविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोदवला. दरम्यान मनसेचे कार्यकर्ते व विशेष करून महिला कार्यकर्त्या महापौर बंगल्याबाहेर जमल्याने त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तारा महापौरांनी भायखळा व बाजूच्या विभागातील कार्यकर्त्ये व नगरसेवकांना आपल्या बचावासाठी बंगल्यावर बोलावून घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण -
सांताक्रूझ वाकोला येथे माला नगम व संकेत नगम या दोघांचा शोक लागून मृत्यू झाला. विभागात पाणी साचून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको केला. या मृतांच्या घरी महापौर विश्वनाथ महाडेश्वर स्थानिक आमदार तृप्ती सावंत, स्थानिक नगरसेविका प्रज्ञा भुतकर यांच्यासह भेट देण्यास गेले असता स्थानिक नागरिकांनी अडवले असता नागरिक आणि महापौरांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी संतप्त झालेल्या माहापौरांनी एका महिलेचा हात पिरगळून ये तू मला ओळखत नाहीस का असे शब्द वापरून धमकी दिली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. Conclusion:null
Last Updated : Aug 9, 2019, 10:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.