मुंबई - डोंगरी वाडीबंदर मासळी बाजाराबाहेर बसणाऱ्या अनधिकृत परप्रांतियांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अवघ्या 24 तासात मनसे स्टाईलने दणका दिला. डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीय मासेविक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यांच्या मुजोरीमुळे आमचा व्यवसाय मंदावल्याची तक्रार कोळी बांधव-भगिनींनी राज ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यावर मनसेकडून कारवाई करण्यात आली आहे.
कोळी महिलांनी थेट राज ठाकरेंची भेट घेऊन याविषयाकडे लक्ष घालण्याची मागणी केली होती. डोंगरी वाडी बंदराहून आलेल्या कोळी महिलांची राज ठाकरे यांनी कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर येऊन भेट घेत त्यांची समस्या जाणून ती सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्याची पूर्ती अवघ्या 24 तासात करण्यात आली आहे. मनसेचे स्थानिक विभागाध्यक्ष संजय नाईक यांनी 24 तासातच बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना दणका दिला. यामुळे कोळी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी
हेही वाचा - महाराष्ट्रातल्या लेकीबाळी रस्त्यावर पडल्या का?; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
-
'राजसाहेब, अनधिकृत मासेविक्रेत्यांपासून आम्हाला त्रास होतोय. त्यांचा बंदोबस्त करा', कृष्णकुंजवर येऊन कोळी भगिनींनी राजसाहेबांकडे मदत मागितली आणि स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक ह्यांनी २४ तासात त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना #मनसेदणका दिला. #आपलीमुंबई https://t.co/856h02igNo pic.twitter.com/tVdL5FT7jl
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">'राजसाहेब, अनधिकृत मासेविक्रेत्यांपासून आम्हाला त्रास होतोय. त्यांचा बंदोबस्त करा', कृष्णकुंजवर येऊन कोळी भगिनींनी राजसाहेबांकडे मदत मागितली आणि स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक ह्यांनी २४ तासात त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना #मनसेदणका दिला. #आपलीमुंबई https://t.co/856h02igNo pic.twitter.com/tVdL5FT7jl
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 6, 2020'राजसाहेब, अनधिकृत मासेविक्रेत्यांपासून आम्हाला त्रास होतोय. त्यांचा बंदोबस्त करा', कृष्णकुंजवर येऊन कोळी भगिनींनी राजसाहेबांकडे मदत मागितली आणि स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक ह्यांनी २४ तासात त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना #मनसेदणका दिला. #आपलीमुंबई https://t.co/856h02igNo pic.twitter.com/tVdL5FT7jl
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 6, 2020