मुंबई विकास कामांच्या प्रकल्पांना मुदत वाढ ही तशी नित्याची बाब आहे. मात्र एखाद्या प्रकल्पाला झालेला विलंब हा जनतेच्या दृष्टीने गैरसोयीचा ठरत असला, तरी कंत्राटदार आणि सल्लागार कंपन्यांचे मात्र उखळ पांढरे होते. मुंबईतील मेट्रो चारच्या प्रकल्पाला Mumbai Metro 4 Project झालेल्या विलंब सल्लागार कंपनीच्या पथ्यावरच पडला असून तब्बल 96 कोटी रुपयांची वाढ देण्यात आली आहे.
मुंबईतील मेट्रो प्रकल्प कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने चर्चेत राहिले आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या जागेवरून आणि कारशेटच्या जागेवरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. त्यातच मेट्रो-४ व ४-अ चा प्रकल्पाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून रखडले Mumbai Metro 4 Project delay issue आहे. मात्र हे रखडलेले काम सल्लागार कंपनीच्या चांगलेच पथ्यावर पडले आहे. अडीच वर्षाच्या मुदतवाढीसह डीबी हिल-एलबीजी या संयुक्त कंपनीच्या मोबदल्यात तब्बल ९६ कोटींची वाढ करुन एमएमआरडीएने कंपनीचे उखळ पांढरे केले आहे.
काय आहे हा प्रकल्प? मेट्रो प्रकल्पाची एकूण लांबी ३५.३८ किमी असून या मार्गावर ३२ मेट्रो स्थानके प्रस्तावित आहेत. या मार्गिकेचा मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या तीन महानगरांतील प्रवाशांना फायदा होणार आहे. तर ही मार्गीका पुढे भिवंडी आणि कल्याण तळोजास जोडली जाणार आहे. वडाळा-घाटकोपर-कासारवडली-गायमुख मेट्रो मार्ग क्रमांक मेट्रो-४ व ४-अ साठी एमएमआरडीने २७ सप्टेंबर २०१६ रोजी १४ हजार ५४९ कोटींच्या खर्चास मान्यता दिली.
सल्लागार कंपनीला 96 कोटी रुपयांचा वाढीव मोबदला २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. ऑगस्ट २०१७ मध्ये डीबी हिल-एलबीजी या कंपन्यांना संयुक्तपणे सल्लागार म्हणून नेमण्यात आले. त्यावेळी कंपनीस २८३ कोटी २१ लाख सल्लागार शुल्क आणि ३१ मे २०२२ पर्यंत सेवा देण्याची मुदत देण्यात आली. मात्र ही मुदत टळून गेल्याने सल्लागार कंपनीने वाढीव मोबदला देण्याची मागणी केली. त्यामुळे आता नव्याने तब्बल ९६ कोटी १० लाख इतक्या वाढीसह शुल्क ३७९ कोटी ३२ लाख इतके करून फेब्रुवारी २०२५ पर्यंत एमएमआरडीएने मुदतवाढ दिली Increased remuneration Of Consulting Company आहे.
का रखडला प्रकल्प ? मुंबई-ठाणे-मीरा-भाईंदर या तीन महानगरांना जोडणाऱ्या या मेट्रो-४ व ४-अ चे काम कोविड महामारीमुळे मुख्यत्वे रखडले. तरी भूसंपादन, सीआरझेड विषयक परवानग्यांमुळे २०१६ पासून या प्रकल्पात अनेक अडचणी निर्माण झाल्या. मेट्रो -४ व ४-अ चा मार्ग वडाळा येथून सुरू होऊन तो भाईंदरच्या गायमुखपर्यंत जातो. मात्र, या मार्गात सुमननगर, अमरमहल चेंबूर येथील स्थानकांच्या मार्गात आलेल्या अडचणी, गोदरेज कंपनीने नियोजित मार्गास जागा देण्यास नकार देऊन न्यायालयात धाव घेतल्याने ही विलंब झाला. तर कास्टिंग हस्तांतरणास झालेला विलंब, कांदळवन, वृक्षछाटणी, पोहच रस्ते नसणे, मोघरपाडा येथील नियोजित कारशेडला अद्यापपर्यंत जागा न मिळणे, यामुळे मेट्रो मार्गाच्या उभारणीत विलंब झाल्याचे एमएमआरडीए मधील सूत्रांनी सांगितले.
कधीपर्यंत पूर्ण होणार काम ? वडाळा मेट्रो स्थानक,नियोजित जीएसटी भवन यांचे एकत्रिकरण, तसेच सिद्धार्थ कॉलनी मेट्रो स्थानक आणि मेट्रो मार्ग क्रमांक २ ब यांचे एकत्रिकरण शिवाय गांधीनगर मेट्रो स्थानकासह मार्ग क्रमांक ५ आणि ६ चे एकत्रीकरण यामुळे कालमर्यादा आल्या आहेत. यशवंतनगर सोसायटी, घाटकोपर यांनी न्यायालयात घेतलेली धाव, सावित्रीबाई फुलेनगरवासीयांची हरकत, मेट्रोच्या दोन खांबातील अंतर कमी करणे आणि दीड वर्षांच्या कोविड महामारीमुळे हा मार्ग मुदतीत पूर्ण होऊ शकलेला नाही. सध्या त्याचे ३८ टक्केच काम पूर्ण झाले असल्याने आता मे २०२४ पर्यंत तो पूर्ण होणे अपेक्षित असून सल्लागार शुल्कात वाढ करणे आवश्यक असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. त्यामुळे डीबीहील आणि एलजीबी या सल्लागार कंपनीकडून मेट्रोने सुमारे पावणे चारशे कोटी रुपयांचा सल्ला घेतला आहे. MMRDA Increased 96 crore remuneration Of Consulting Company Mumbai Metro 4 Project delay issue