मुंबई - दहीसर ते अंधेरी अंधेरी आणि दहिसर ते डी एन नगर असा प्रवास करण्यासाठी आजच्या घडीला मुंबईकरांना मोठी कसरत करावी लागते. लोकल, बेस्टमधील गर्दी, वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. पण आता मात्र लवकरच अगदी सात-आठ महिन्यांत मुंबईकरांची या त्रासातून सुटका होणार असून हा प्रवास सुकर आणि गारेगार होणार आहे. कारण आता मेट्रो 2 अ ( दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) हे मार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठीच्या महत्वाच्या टप्प्याला आता सुरुवात होत आहे. हा टप्पा म्हणजे ट्रायल रन. मेट्रो 2 अ आणि 7 या मार्गावर सोमवारी, 31 मे रोजी ट्रायल रन घेतली जाणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)तील विश्वसनीय सूत्रांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तर ही ट्रायल रन यशस्वी झाल्यास उर्वरित काम पूर्ण करत डिसेंबर अखेरीस हे मार्ग वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा फटका
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडत मुंबईकरांना मेट्रोसारखी अत्याधुनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएने या दोन मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले. त्यानुसार हे दोन्ही मेट्रो मार्ग डिसेंबर 2020मध्ये सुरू होणार होते. मात्र मार्च 2020मध्ये राज्यात-देशात कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले. या प्रकल्पावर काम करणारे मजूर भीतीने आपापल्या गावी गेले. परिणामी काम मंदावले. डेडलाइन चुकली. पण दिवाळीनंतर कामाने वेग घेतला. त्यानुसार एमएमआरडीएने मे 2021ची नवीन डेडलाइन दिली. पण ही डेडलाइनही आता चुकली आहे. याला कारण ही कोरोना आणि लॉकडाऊन ठरले आहे. पण आता मात्र डिसेंबर अखेरपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करत हे दोन्ही मार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार आता ट्रायल रन घेण्यात येणार असून यासाठी 31 मेचा मुहूर्त ठरवण्यात आल्याचे समजते आहे.
20 किमी मार्गावर होणार ट्रायल?
ट्रायल रन हा मेट्रो मार्ग सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण ट्रायल रन झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू होते, तर हे प्रमाणपत्र मिळेपर्यंत उर्वरित सर्व काम पूर्ण करण्यात येते. त्यानुसार आता मेट्रो 2 अ आणि 7 वर ट्रायल रन घेत पुढील प्रक्रिया पूर्ण करत डिसेंबर अखेर मुंबईकराना या मार्गावर प्रवास करता येणार आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मेला 20 किमी मार्गावर ट्रायल रन होणार आहे. तर मेट्रो 2 अ आणि 7 मार्गावरील आरे ते कामराज नगर दरम्यान ही ट्रायल रन होण्याची शक्यता आहे.
मेट्रो 2 अ आणि 7 ची ट्रायल रन 31 मे रोजी; लवकरच मुंबईकरांच्या सेवेत नवीन दोन मेट्रो मार्ग! - दहिसर ते डी एन नगर मेट्रो ट्रायल
लोकल, बेस्टमधील गर्दी, वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. पण आता मात्र लवकरच अगदी सात-आठ महिन्यांत मुंबईकरांची या त्रासातून सुटका होणार असून हा प्रवास सुकर आणि गारेगार होणार आहे. कारण आता मेट्रो 2 अ ( दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) हे मार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठीच्या महत्वाच्या टप्प्याला आता सुरुवात होत आहे.