ETV Bharat / city

विधानपरिषद निवडणुकीनिमित्त वेगवान राजकीय हालचाली, महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार हॉटेल ट्रायडंट येथे झालेल्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत या सर्व आमदारांना पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले. तसेच या सभेला राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या 22 उमेदवारांची महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. विधानपरिषद निवडणुकीच्या ( Vidhan Parishad Election 2022 ) पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी हॉटेलचा पर्याय ( Maharashtra All Party Mlas In Mumbai Luxury Hotel ) निवडला आहे.

महाविकास आघाडी
महाविकास आघाडी
author img

By

Published : Jun 19, 2022, 7:05 AM IST

Updated : Jun 19, 2022, 9:55 AM IST

मुंबई- विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून वेगवान राजकीय हालचाली होत असल्याचे ( Maharashtra All Party Mlas In Mumbai ) दिसत आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक ( meeting on Legislative council election ) होणार आहे. या बैठकीत सर्व आमदारांना मार्गदर्शन आणि मतदानाबाबत च्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP leader Jayant Patil ) यांनी शनिवार मुंबईत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार हॉटेल ट्रायडंट येथे झालेल्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत या सर्व आमदारांना पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले. तसेच या सभेला राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या 22 उमेदवारांची महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. विधानपरिषद निवडणुकीच्या ( Vidhan Parishad Election 2022 ) पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी हॉटेलचा पर्याय ( Maharashtra All Party Mlas In Mumbai Luxury Hotel ) निवडला आहे. या आमदारांवर लाखो रुपये खर्च केले जात असले, तरीही मत फुटण्याची भीती कायम आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ट्रायडंट हॉटेलमध्ये राहणार-राज्यसभा निवडणुकीत आमदारांना दोन दिवस हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर झालेल्या मतदानात महाविकास आघाडीला तोंडघशी पडावे लागले आहे. सर्व आमदारांना एकत्र बांधून ठेवल्यानंतरही महाविकास आघाडीला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकांसाठी महाविकासआघाडी सरकारमधल्या घटक पक्षांनी आणि विरोधकांनी आपापल्या आमदारांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी हॉटेलचा पर्याय निवडला आहे. शिवसेनेने आपल्या आमदारांना हॉटेल वेस्ट इनमध्ये ठेवले आहे. तर, भाजपने ताज हॉटेलचा आधार निवडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही आपल्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीला लागणार मतांची गरज - विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने उभे केलेले आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठीची मते शिवसेनेकडे आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला अद्यापही तीन मतांची गरज भासणार आहे. त्यातच काँग्रेसला जवळपास दहा मतांची गरज लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सोबत असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांच्या नियोजनाबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

हेही वाचा-Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांची 'अग्निपथ'वरुन केंद्र सरकारवर टीका, म्हणाले, 'देशालाही कंत्राटीवर...'

हेही वाचा-Vidhan Parishad Election 2022 : हॉटेल पॉलिटिक्समध्ये आमदारांसाठी कोट्यावधींचा चुराडा; तरीही धाकधुक कायम

हेही वाचा-Sharad Pawar counsel NCP MLA : शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना कानमंत्र, बैठकीला अपक्ष आमदारांची हजेरी

Last Updated : Jun 19, 2022, 9:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.