ETV Bharat / city

मराठा आरक्षणाप्रमाणेच शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतही राज्य सरकारच्या मनात पाप - विनायक मेटे - अरबी समुद्रात शिवाजी महाराज स्मारक

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी एक तासही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामासाठी वेळ दिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर फक्त सरकार राजकारण करत आहे. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर स्मारकाकडे दुर्लक्ष झाले. असा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी केला.

mla vinayak mete
mla vinayak mete
author img

By

Published : Jun 18, 2021, 4:53 PM IST

Updated : Jun 18, 2021, 5:05 PM IST

मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी एक तासही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामासाठी वेळ दिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर फक्त सरकार राजकारण करत आहे. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर स्मारकाकडे दुर्लक्ष झाले. असा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कार्यालयास विनायक मेटे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत हा मुद्धा मांडला. ते म्हणाले, 2005 ला स्मारकाला मान्यता मिळाली. फडणवीस सरकारने स्मारकाला गती देण्याचे काम केले. ठाकरे सरकारने स्मारकाचे काम कुठे अडकले आहे, यासाठी एकही बैठक घेतलेली नाही. स्मारकाच्या कामाकडे दुर्लक्ष हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यातच सामान्य प्रशासनाकडे स्मारकाचे काम आहे आणि हे खाते मुख्यमंत्री यांच्याकडे असूनही दुर्लक्ष होत आसल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना विनायक मेटे
सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रकरणे हायकोर्टाकडे सोपवली आहेत. या सरकारकडून साधा विनंती अर्ज सुद्धा न्यायालयाला केला गेलेला नाही. स्मारकाबद्दल कोणतेही काम किंवा हालचाल सरकारने केलेली नाही या स्मारकाला पुढे घेऊन जायचं नाही. हे सरकार फक्त छत्रपतींचे नाव घेऊन मतं मिळवायचं काम करत आहे. याला सर्वस्वी जबाबदार अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. यांना जर थोडी चाड असेल तर त्यांनी काम करायला विनंती करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्मारकाचे भुमीपूजन केलं म्हणून महाविकास आघाडी सरकारचा यामध्ये रस नाही. त्यामुळे तसा राग आहे का? जर सरकारने काम केलं नाही तर आम्ही शिवसंग्रामच्या वतीने कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कोणीही आडवं आलं तर त्यांना आडवं करण्याची आमची तयारी आहे, असा इशारा विनायक मेटे यांनी सरकारला दिला.

Last Updated : Jun 18, 2021, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.